मुंबई । प्रतिनिधी - मुंबई शहराच्या सन 2014 ते 2034 च्या नव्या आराखड्याबाबत सूचना व हरकती मागवण्यास महानगर पालिकेच्या सभागृहात सोमवारी मंजूरी मिळाली आहे. सभागृहाची मंजूरी मिळाल्यावर आता हां आराखडा वेबसाईट वर टाकला जाणार असून 60 दिवस या आराखड्याबाबत मुंबईकर जनतेकडून सूचना व हरकती मागवल्या जाणार आहेत.
मुंबईच्या विकास आराखडया बाबत लोकांच्या हरकती व सूचनां नुसार पुन्हा सुधारणा करण्यात येणार आहेत. यासाठी स्थायी समितीचे ३ सदस्य आणि राज्य सरकारच्या वतीने ४ सदस्य अशा प्रकारे ७ सदस्यांची एक समिती तयार केली आहे. या समितीच्या वतीने सुनावणी घेऊन त्या प्रमाणे विकास आराखडय़ात फेरफार करुन अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. त्यानंतर महापालिकेच्या मंजुरीने राज्य सरकारला हा अंतिम विकास आराखडा सादर केला जाणार आहे.
