मुंबई : केंद्राकडे प्रलंबित असलेल्या राज्याच्या पर्यावरणविषयक प्रश्नांमुळे सकारात्मक निर्णय घेऊन ते तातडीने मार्गी लावावेत, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे सोमवारी केली. या बैठकीत सागरी महामार्ग तसेच सीआरझेड क्षेत्रात येणार्या एसआरए प्रकल्पांबाबतही चर्चा करण्यात आली.
वर्षा निवासस्थानी केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केंद्राकडे प्रलंबित असलेल्या राज्यातील पर्यावरणविषयक प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. या वेळी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारणे, महापालिकेच्या कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लानची सद्यस्थिती, सीआरझेड १,२,३ संबंधित प्रलंबित प्रश्न, सेझ, वॉटर फ्रंट, झोपडपट्टी पुनर्वसनाबाबतचे प्रलंबित प्रश्न आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. याबाबत राज्याने केंद्राकडे पाठपुरावा करावा, त्यावर सकारात्मक निर्णय घेऊन राज्याचे प्रलंबित पर्यावरणविषयक प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावले जातील, असे आश्वासन प्रकाश जावडेकर यांनी या वेळी दिले. मुंबई महानगरपालिका आयुक्त सीताराम कुंटे, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अजय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर, नगर विकासचे प्रधान सचिव नितीन करीर, नगर विकासच्या सचिव मनीषा म्हैसकर, वन विभागाचे सचिव विकास खारगे, ठाणे महापालिका आयुक्त असिम गुप्ता आदी उपस्थित होते.