सागरी सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करा - मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सागरी सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करा - मुख्यमंत्री

Share This
मुंबई : मुंबईची सागरी सुरक्षा अधिक सक्षम करण्यात यावी, तसेच सागरी मार्गाने होणारी अवैध वाहतूक आणि सागरी मार्गाने परदेशी दहशतवाद्यांचा हल्ला होऊ नये यासाठी काटेकोर सुरक्षा व्यवस्था निर्माण करावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी गिरगाव चौपाटी ते वाशीदरम्यान सागरी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली त्या वेळी ते बोलत होते. मुंबईवर २६/११ चा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा दहशतवादी सागरी मार्गानेच मुंबईत घुसले होते. या हल्ल्यानंतर मुंबईवर अशा प्रकारे पुन्हा सागरी मार्गाने हल्ला होऊ नये यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. या उपाययोजनांची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, पोलीस तसेच नौदलाचे अधिकारीदेखील या वेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरगाव चौपाटी ते वाशी या मार्गाने प्रवास करत सागरी सुरक्षेचा आढावा घेतला. विविध उपाययोजनाही त्यांनी या वेळी सुचवल्या. सागरी मार्गाने होणारी अवैध वाहतूक रोखण्यात यावी, तसेच सागरी मार्गाने दहशतवादी हल्ला होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना करण्यात याव्यात, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐरोली येथे जाऊन मॅनग्रोव्हजचीदेखील पाहणी केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages