मुंबई (प्रतिनिधी) : स्वाईन फ्लूचे देशासह महाराष्ट्रातदेखील थैमान वाढत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या दहा दिवसांतच देशभरात स्वाईन फ्लूमुळे २१६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, तर मुंबईत आज ( १२ फेब्रुवारी ) एकाच दिवशी तीनजणांचा मृत्यू झाला आहे, तसेच राज्यात आतापर्यंत ४० रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली.
विशेष म्हणजे गेल्या २४ तासांत १६ मुंबईकरांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये तीन आणि दहा महिन्यांच्या चिमुरड्यांचाही समावेश आहे. नागपुरात स्वाईन फ्लूचे सर्वात जास्त रुग्ण आढळले. अपुर्या आरोग्य सुविधांमुळे देशभरात स्वाईन फ्लूचा धोका वाढत चालला आहे. यामुळे त्याला नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान राज्याच्या आरोग्य विभागासमोर आहे.