पालिकेतील सत्ताधार्यांनी धोकादायक इमारतींची चर्चा सोडून भाषेचा मुद्दा केला - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेतील सत्ताधार्यांनी धोकादायक इमारतींची चर्चा सोडून भाषेचा मुद्दा केला

Share This
विरोधी पक्षांचा सभात्याग 
मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगर पालिकेतील सभागृहात धोकादायक इमारतीबाबत नगरसेवक अशरफ आझमी यानी ६६ बी अंतर्गत चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला असता सत्ताधारी धोकादायक इमारतीबाबत गभीर नसल्याचे उघड होणार या भीतीने सत्ताधारी शिवसेना भाजपा  नगरसेवकानी धोकादायक इमारतीबाबत चर्चा करण्याचे टालुन भाशा हा मुद्दा केल्याने विरोधी पक्ष असलेल्या कोंग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने सभात्याग केला. 

गुरुवारी पालिका सभागृहात नगरसेवक अशरफ आझमी यानी ६६ बी अंतर्गत मुंबई मधील धोकादायक इमारतीबाबत निवेदन सादर केले होते. या निवेदनावर बोलताना  नेहमी  प्रमाणे   इतर सदस्या प्रमाणे आझमी यानी निवेदनाची सुरुवात मराठी मधे व नंतर हिंदी मधे बोलन्यास  सुरुवात   केली. याला भाजपा नगरसेवक दिलीप पटेल यानी हरकत घेवुन आधी पूर्ण निवेदन वाचा अशी मागणी केली. याला शिवसेनेच्या नगरसेवकानी याला पाठिंबा दिला आणि आझमी याचा  मुद्दा दाबण्याचा प्रयत्न केल्याने कोंग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाने या प्रकाराचा निषेध करत  सभात्याग केला. 

अशरफ आझमी यानी मागील आठवड्यात मलनिस्सारण विभागातील साफ सफाई बाबत ६६ बी नुसार सभाग्रुहाचे लक्ष वेधले होते त्यावेळी हिंदी मधे बोलताना कोणीही विरोध केला नाही. परंतू आज धोकादायक इमारतीचा विषय असल्याने विरोध केला. मुंबई मधे सी १ मधे ४५१ तर सी २ मधे ५०० इमारती धोकादायक स्थिती मधे आहेत. पालिकेच्या ३५०५ इमारती आहेत त्या पैकी ७४३ चे स्त्रकचारल ओडिट झाले असून या पैकी ९१ इमारती अतिधोकदायक स्थितीमधे आहेत. पालिकेच्या  सर्वच   सर्व इमारतीचे स्ट्रकचरल ओडिट केले तर ही संख्या अधिक वाढू शकते. या इमारतीमधील रहिवाशी आपला जिव मुठीत घेवुन राहत आहेत. यामुले याबाबत चर्चा केल्यास सत्ताधारी  शिवसेना आनी भाजपाचे पीतळ उघडे पडेल म्हणून भाषेचा मुद्दा करत नगरसेवाकांचा आवाज दाबला जात असल्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र आम्बेरकर आणि अशरफ आझमी यानी सांगितले.   

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages