रेल्वेतील हमालांचे अधिकृत दर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वेतील हमालांचे अधिकृत दर

Share This
मुंबई : रेल्वेतील अधिकृत हमालांकडून ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम आकारण्यावर मध्य रेल्वे प्रशासनाने चाप बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने या तक्रारींची दखल घेत अशा प्रकारे जादा आकार घेणार्‍या हमालांवर कारवाई करण्याचे स्पष्ट केले आहे. अशा प्रकारे जादा रक्कम आकारून नियमभंग करणार्‍या हमालांचे लायसन्स रद्द करण्यात येईल, असा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे. 

रेल्वे स्टेशनवर लांब पल्ल्याच्या प्रवाशांना हमालांची सुविधा उपलब्ध करण्यात येते. यासाठी रेल्वेने लायसन्स देत अधिकृत हमालांची नियुक्ती केली आहे. या हमालांकडून अनेकदा रेल्वेने जाहीर केलेल्या रकमेपेक्षा जादा आकार आकारला जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यावर निर्बंध आणण्यासाठी मध्य रेल्वेने या प्रकारे जादा रक्कम आकारणार्‍या हमालांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. याबाबत नुकतीच रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ), स्टेशन्स अधीक्षक यांची बैठक झाली. त्यात जादा रक्कम आकारणार्‍या हमालांना रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याची भूमिका मांडण्यात आली आहे. या बैठकीत सीएसटी, एलटीटी, ठाणे, कल्याण, दादर अशा स्थानकांवर प्रवाशांकडून जादा रक्कम आकारण्याच्या तक्रारींचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार दोषी हमालाचे लायसन्स रद्द करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. त्यासाठी सर्व हमालांकडून बाँड्स लिहून घेण्यात आले आहेत. त्यात दोषी आढळल्यास लायसन्स रद्द करण्याच्या अटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांनी स्थानकांवर दर्शविण्यात आलेल्या तक्त्यांच्या आधारेच आकार देण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे. याबाबत रेल्वे स्थानकांवर उद्घोषणाही करण्यात येत आहेत. त्यासाठी रेल्वेने १२७५ क्रमांकावर तक्रार करण्याची सूचना केली आहे.
डोक्यावर भार वाहून नेताना ३७ कि.ग्रॅ. ते ४0 कि .ग्रॅ. पर्यंत - ३0 रु.
दोनचाकी गाड्यांवरून १६0 किग्रॅ.पर्यंत - ५0 रु.
अर्धा तासापर्यंत प्रतीक्षा दर- नि:शुल्क
अर्धा तासानंतर - ३0 रु.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages