MCGM पोलिस व समन्वय समितीच्या मदतीनेमहापरिनिर्वाण दिनी महापालिकेचा दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न – मनपा आयुक्त श्री. कुंटे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

MCGM पोलिस व समन्वय समितीच्या मदतीनेमहापरिनिर्वाण दिनी महापालिकेचा दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न – मनपा आयुक्त श्री. कुंटे

Share This
बृहन्मुंबई महानगरपालिका
क्रमांक – पीआरओ/ ६०२ /पी, दिनांक – १२.०२.२०१५
जनसंपर्क विभाग
पोलिस व समन्वय समितीच्या मदतीनेमहापरिनिर्वाण दिनी महापालिकेचा दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न – मनपा आयुक्त कुंटे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५८ व्या महापरिनिर्वाण दिनी उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या अधिकाऱयांचा महापालिका आयुक्त यांच्या हस्ते सत्कार


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५८ व्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांना बृहन्मुंबई पोलिस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर (स्मारक) चैत्यभूमी समन्वय समितीच्या मदतीनेबृहन्मुंबई महापालिकेनेदर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त श्री. सीताराम कुंटेयांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ०६ डिसेंबर, २०१४ रोजी ५८ व्या महापरिनिर्वाण दिनी उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या पालिका व पोलिस अधिकाऱयांचा पालिका मुख्यालयातील महापालिका आयुक्त दालनाशेजारील कक्षात महापालिका आयुक्त श्री. सीताराम कुंटेयांच्या हस्तेआज (दिनांक १२ फेब्रुवारी, २०१५) छोटेखानी सत्कार समारंभ करण्यात आला, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना तेबोलत होते.

याप्रसंगी महाराष्ट्र शासनाचे सचिव (वने) श्री.विकास खारगे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) पल्लवी दराडे, उप आयुक्त (महापालिका आयुक्त) श्री. सुधीर नाईक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे उपाध्यक्ष श्री. महेंद्र साळवे, सरचिटणीस श्री. नागसेन कांबळे, भिक्षूवर्ग उपस्थित होते. महापरिनिर्वाण दिनी उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या अधिकाऱयांना पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र
देऊन महापालिका आयुक्त श्री. कुंटेयांच्या हस्तेगौरविण्यात आले. यामध्येतत्कालिन अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) व सध्याचेमहाराष्ट्र राज्याचेवनेविभागाचेसचिव श्री. विकास खारगे, सह पोलिस आयुक्त (प्रशासन) श्री. विवेक फणसळकर, परिमंडळ – ५ चेपोलिस उप आयुक्त डॉ. महेश पाटील, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. प्रकाश पाटील, उप आयुक्त (परिमंडळ – २) श्री. आनंद वागराळकर, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) श्री. एस. ए. ए. के. अन्सारी, जी/उत्तर विभागाचेसहायक आयुक्त श्री. शरद उघडे, जनसंपर्क अधिकारी श्री. विजय खबाले-पाटील, शिवाजी पार्क पोलिस स्टेशनचेवरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. परशुराम काकड, जी/उत्तर विभागाचे सहायक अभियंता (परिरक्षण) श्री. राजेश चव्हाण, सहायक अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) श्री. राजेश पाटकर, सहायक अभियंता (जलकामे) श्री. कैलाश घोंगडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतिश वडगिरे, दुय्यम अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) श्री. अभिजित तटकरे, कनिष्ठ अभियंता (परिरक्षण) श्री. मयूर करंजखेलेव दुय्यम अभियंता श्री. संजय पवार यांचा समावेश आहे.

महापालिका आयुक्त श्री. सीताराम कुंटे पुढे बोलताना म्हणालेकी, बृहन्मुंबई महानगरपालिका महापरिनिर्वाण दिनानिमित्त समन्वय समितीकडून आलेल्या सुचनांप्रमाणेअधिकाधिक नागरी सेवा- सुविधा देण्याचा प्रयत्न करते. यावर्षी प्रथमच शासकीय मानवंदना, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, दिशादर्शक बलुन्स तसेच धुळीपासून संरक्षणासाठी आच्छादन करण्यात आले. त्याचप्रमाणेनवीन प्रकारचेटॉयलेट्सची व्यवस्था करुन महापालिकेतर्फेअधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. जनसंपर्क विभागातर्फेदरवर्षी नवनवीन विषयांवर संग्रही ठेवण्यासारखी माहिती पुस्तिका काढण्यात आल्याचेत्यांनी सांगितले. अधिकारी व कर्मचाऱयांनी केलेल्या कामाचेकौतुक व्हावेम्हणून या सत्कार सोहळ्याचेआयोजन केल्याचेत्यांनी शेवटी सांगितले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages