मुंबई : बिना तिकीट प्रवास करू नये, प्रमाणित अंतरा एवढाच प्रवास करावा असे आवाहन बेस्ट प्रशासनाकडून करूनही फुकट्या प्रवाश्यांची संख्या काही केल्या कमी होत नसल्याचे दिसत आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये अशा फुकटय़ा प्रवाशांविरुद्ध केलेल्या कारवाईमध्ये २४ हजार ९२५ फुकटे प्रवासी सापडले होते. त्यांच्याकडून १७ लाख ४७ हजार ४२२ रुपये एवढी रक्कम दंडापोटी वसूल करण्यात आली होती. आता पुन्हा ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये अशा फुकट्या प्रवाशांविरुद्ध केलेल्या कारवाईमध्ये २८ हजार ५१२ फुकटे प्रवासी सापडले आहेत. त्यांच्याकडून २0 लाख २३ हजार ५ रुपये एवढी रक्कम दंडापोटी वसूल करण्यात आली आहे.
बेस्ट बसगाड्यामधून विनातिकीट प्रवास करणार्या प्रवाशांविरुद्ध तसेच खरेदी केलेल्या तिकिटाने प्रमाणित केलेल्या अंतरापेक्षा जास्त प्रवास करणार्या प्रवाशांविरुद्ध बेस्ट प्रशासनाने ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांत विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेअंतर्गत २८ हजार ५१२ फुकटे प्रवासी पकडण्यात आले असून त्यांच्याकडून २0 लाख २३ हजार ५ रुपयांचा दंडदेखील वसूल करण्यात आला आहे. विनातिकीट प्रवास करणार्या प्रवाशांकडून प्रवासभाडे अधिक देय असलेल्या प्रवासी भाड्याच्या रकमेच्या दहापट रक्कम भरण्याचे नाकारल्यास मुंबई महापालिका अधिनियम १८८८ च्या कलम ४६0(ह) अन्वये एक महिना पोलीस कोठडी किंवा २00 रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्रितपणे होऊ शकतात. बसमधून प्रवास करताना योग्य तिकीट खरेदी करणे हे प्रत्येकाला बंधनकारक आहे. विनातिकीट प्रवास करणे हा सामाजिक गुन्हा असल्याने प्रवाशांनी आपले आर्थिक नुकसान आणि मानहानी टाळण्यासाठी योग्य तिकीट खरेदी करावे, तसेच तिकिटावर प्रमाणित केलेल्या अंतराएवढाच प्रवास करावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.