पोस्टमन होणार हायटेक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पोस्टमन होणार हायटेक

Share This
मुंबई : खाकी गणवेषातील पारंपरिक पोस्टमन आता आधुनिक रूप धारण करणार आहेत. पोस्ट खात्याने पोस्टमनला हायटेक करून ऑनलाइन उपकरणे देण्याची तयारी सुरू केली आहे. दूरसंचार क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे पोस्ट व्यवसायात प्रचंड स्पर्धा वाढली आहे. या स्पध्रेत तग धरण्यासाठी पोस्टाने आपल्या सेवा आधुनिक करण्याचा निर्णय घेतला आहे.

पोस्ट विभागाने ठरवल्याप्रमाणे सर्व गोष्टी जुळून आल्यास लवकरच पोस्टमनच्या हाती मनिऑर्डर करण्याचे उपकरण दिसू लागेल. यामुळे पोस्टमन घरी येऊन मनिऑर्डर करू शकणार आहे. परिणामी, ग्राहकांना मनिऑर्डर करण्यासाठी पोस्टात हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही. कारण पोस्टमनकडील उपकरण पोस्टाच्या मेन सर्व्हरला जोडलेले असेल आणि ते सीमच्या आधारे चालेल. त्यात ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिमदेखील अँक्टिव्हेट केलेली असेल. यामुळे पोस्टमन नक्की कोठे आहे हेदेखील समजू शकणार आहे. पोस्टमन मनी ऑर्डर देताना संबंधितांचे हस्ताक्षर कागदावर घेतात. या जागी आता ते अंगठाचा ठसा घेतील. यामुळे ग्रामीण भागातही हे उपकरण वापरणे सोपे होणार आहे. सध्या पोस्ट खाते या योजनेवर विचार करत आहे. अधिकृत घोषणा मात्र अजून करण्यात आलेली नाही.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages