मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिकेला मिलनारे जकातीचे उत्पन्न बंद होणार असल्याने मुंबईकर जनतेवर येत्या काही वर्षात गलिच्छ वस्त्यांवर मालमत्ता कर, वाहतुक उपकर, साफसफाई उपकर आणि अग्निशमन उपकर लावण्याची, झोपडपट्ट्यांच्या पाणीपुरवठा दरात हजार लिटरमागे 35 पैसे वाढ, तसेच मालमत्ता करात 40 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा करत मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यानी पालिकेचा सन २०१५ -१६ चा ३३ हजार ५१४ कोटी १५ लाख रुपयांचा २ कोटी रूपये शिलकीचा अर्थसंकल्प स्थायी समितित सादर केला. सन २०१४ - १५ पेक्षा आगामी अर्थसंकल्प २७. २५ टक्क्यांनी जास्त आहे. मुंबईकर जनतेवर आगामी काळात नवे कर लावले जाणार असल्याने कराच्या ओझ्याखाली मुंबईकर जनता भरडली जाणार आहे. यामुले मुंबईकर नागरिकांवर लवकरच बुरे दिन येणार आहेत.
मुंबई महानगर पालिकेला जकातीमधून ७ हजार कोटीहुन अधिक उत्पन्न मिळते परंतू आता जकात रद्द करून जीएसटी कर लावला जाणार आहे. यामुळे पालिकेला या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार असल्याने पालिकेला येत्या काही वर्षात नवे कर लावावे लागतील असे कुंटे यानी सांगितले. पालिकेच्या आगामी बजेट मध्ये रस्ते, पुल, आरोग्य वैद्यकीय सेवा,पाणी पुरवठा उद्याने इत्यादी साठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. पालिकेमधे सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाजवळ लावण्यात आलेल्या अखंड ज्योतीसाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली असून मुंबईकर जनतेच्या खिशातून हे पैसे वसूल केले जाणार आहेत. पालिकेने मुंबईकर नागरिकांसाठी कोणत्याही नव्या घोषणा न करता अपूर्ण असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला आहे.
- झोपडपट्ट्यांच्या पाणीपट्टी दरात 1000 लिटरमागे 35 पैसे वाढ
- झोपडपट्ट्यांवर मालमत्ता कर,
- मालमत्ता करात 40 टक्क्यांपर्यंत वाढ
- वाहतूक उपकर, साफसफाई उपकर, अग्निशमन कर
- अनधिकृत बांधकामांवर दंडआकारणी
- शुल्क आणि भाड्यात वाढ
- म्हाडा वसाहतीतील पायाभूत सुविधांच्या दर्जोन्नती खर्चाची वसुली
- व्यवसाय कर महापालिकेकडे
- मालमत्ता करात 40 टक्क्यांपर्यंत वाढ
- वाहतूक उपकर, साफसफाई उपकर, अग्निशमन कर
- अनधिकृत बांधकामांवर दंडआकारणी
- शुल्क आणि भाड्यात वाढ
- म्हाडा वसाहतीतील पायाभूत सुविधांच्या दर्जोन्नती खर्चाची वसुली
- व्यवसाय कर महापालिकेकडे
ठळक वैशिष्ट्ये
- रस्ते, पूल, वाहतूक प्रचालन : 3857.53 कोटी
- पाणीपुरवठा : 1862.43 कोटी
- पर्जन्य जलवाहिन्या : 1097.65 कोटी
- आरोग्य : 3359.78कोटी
- मलनिःसारण : 673.54 कोटी
- घनकचरा व्यवस्थापन आणि परिवहन : 422.50 कोटी
- अग्निशमन दल आणि आपत्कालिन व्यवस्थापन : 273.90 कोटी
- माहिती तंत्रज्ञान : 129.12 कोटी
- गलिच्छ वस्ती सुधारणा : 217.88
- बाजार आणि देवनार पशुवधगृह : 52.80 कोटी
- सागरी मार्ग : 200 कोटी
- पंपिंग स्टेशन : 196 कोटी
- ब्रिमस्टोवॅड प्रकल्प : 376 कोटी
- मिठी नदीचा विकास : 35 कोटी
- महापालिका मालमत्तांची दुरुस्ती, गलिच्छ वस्ती सुधारणा : 448.45 कोटी
- शिक्षण विभाग : 1794.44 कोटी
- व्हर्च्युअल क्लासरूम : 17 कोटी
- प्राणिसंग्रहालयाचा विकास : 49 कोटी
- शौचालय बांधणी : 30 कोटी 85 लाख
- पाणीपुरवठा : 1862.43 कोटी
- पर्जन्य जलवाहिन्या : 1097.65 कोटी
- आरोग्य : 3359.78कोटी
- मलनिःसारण : 673.54 कोटी
- घनकचरा व्यवस्थापन आणि परिवहन : 422.50 कोटी
- अग्निशमन दल आणि आपत्कालिन व्यवस्थापन : 273.90 कोटी
- माहिती तंत्रज्ञान : 129.12 कोटी
- गलिच्छ वस्ती सुधारणा : 217.88
- बाजार आणि देवनार पशुवधगृह : 52.80 कोटी
- सागरी मार्ग : 200 कोटी
- पंपिंग स्टेशन : 196 कोटी
- ब्रिमस्टोवॅड प्रकल्प : 376 कोटी
- मिठी नदीचा विकास : 35 कोटी
- महापालिका मालमत्तांची दुरुस्ती, गलिच्छ वस्ती सुधारणा : 448.45 कोटी
- शिक्षण विभाग : 1794.44 कोटी
- व्हर्च्युअल क्लासरूम : 17 कोटी
- प्राणिसंग्रहालयाचा विकास : 49 कोटी
- शौचालय बांधणी : 30 कोटी 85 लाख
