मुंबई / अजेयकुमार जाधव
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते माजी उप मुख्य मंत्री आमदार आर आर पाटील याना श्रधांजली वाहून स्थायी समितीची बैठक तहकुब करावी ही मागणी धुडकावून लावल्याने विरोधाकानी केलेल्या स्भात्यागचा फायदा उचलत शिवसेना भजपाने मुंबईकर जनतेचे पाणी आणि मलनिस्सारण कर वाढवले आहेत.
पालिका प्रशासनाने जल आकार व मलनिस्सारण आकाराच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याचे धोरण आखले होते. यामध्ये पाणी तसेच मलनिस्सारण करात वाढ सुचवण्यात आली होती या प्रस्तावाला शुक्रवारी स्थायी समिती मधे विरोधक नसल्याचा फायदा उचलत मंजूरी दिली आहे. समिती बैठकीत पाणी आणी मलनिस्सारण कर वाढीला मंजूरी दिल्यावर नंतर आर आर पाटील याना शर्धांजलि वाहन्यात आली. यामुले विरोधकानी सताधार्यांचा निषेध नोंदवला आहे.
मुंबई महानगरपालिकेने दोन वर्षा पूर्वी बजट सादर करताना पाणी करा मधे दरवर्षी 8 टक्के दर वाढ करण्याचे सुचवले होते.सन 2014 मधे लोकसभा आणि विधानसभेच्या निवड्नुका असल्याने स्थायी समिती सदस्यानी हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यास प्रशासनाला भाग पाडले होते. पुन्हा हा प्रस्ताव स्थायी समिती पुढे सादर करण्यात आला होता. आता या प्रस्तावाला मंजूरी मिळाली असल्याने 1एप्रिल 2014 मागील वर्षाचे ८टक्के आणि आणि चालू ( सन 2015-16) वर्षाचे ८ टक्के असे १६टक्के अधिक द्यावे लागणार आहेत. तसेच मलनिःसारण करात देखील २० टक्के वाढ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. परंतू स्थायी समिती सदस्यानी 10 टक्के दरवाढ करण्याची मागणी केलि असता सदस्यांच्या मागणी नुसार 10 टक्के दर वाढ करत मल निस्सारण कर आता 70 टक्के द्यावा लागणार आहे.
