महिनाअखेरीस पाच दिवस बँका बंद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महिनाअखेरीस पाच दिवस बँका बंद

Share This
मुंबई : सार्वजनिक बँकांतील देशभरातील कामगार येत्या २५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान संपावर जातील, अशी घोषणा सार्वजनिक बँक कामगार संघटनांनी केली आहे. यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केवळ दोन दिवसच बँका सुरू राहणार आहेत. संपाचे चार दिवस संपल्यानंतर पाचवा दिवस रविवार असल्याने बँका एकूण पाच दिवस बंद राहतील. यामुळे सर्वसामान्यजन आणि व्यापारी वर्गाची मोठी गैरसोय होणार आहे. 

भारतीय बँकांच्या संघटनेने सुमारे दोन वर्षांपासून बँक कामगारांच्या वेतनवाढीची मागणी प्रलंबित ठेवल्यामुळे कामगार संघटनांना संपाचे हत्यार उपसावे लागले आहे. इंडियन बँक असोसिएशनने अलीकडे वेतनवाढीचा दिलेला प्रस्ताव बँक कामगार संघटनांचा महासंघ असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनला नामंजूर आहे. 

यामुळे सर्व बँकांचे कर्मचारी संपावर जातील, अशी घोषण या संघटनेने केली आहे. बँकांच्या इंडियन बँक असोसिएशन (आयबीए) संघटनेने बँक कामगारांना ११ टक्क्यांवरून १३ टक्के वेतनवाढ देण्याचा नवा प्रस्ताव कामगार युनियनपुढे ठेवला आहे. मात्र युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू) संघटनेचे समन्वयक एम. व्ही. मुरली यांना हा प्रस्ताव मंजूर नसल्याचे जाहीर केले आहे. कामगार संघटनांनी १९ टक्के वेतनवाढीची मागणी केली आहे. २८ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. यामुळे बँकांच्या संभाव्य संपाचा फटका सरकारी निधी हस्तांतरणास बसणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages