पालिका जागी झाली आणि तयारीला लागली
मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबईमध्ये १९ जानेवारी पासून अद्याप 'स्वाइन फ्लू' चे २३ रुग्ण मिळाले असून त्या पैकी ४ रुग्णांचा मृत्यु झाल्यावर मुंबई महानगर पालिकेला जाग आली आहे. ४ रुग्णांचा मृत्यु झाल्यावर पालिका कामाला लागली असून पालिकेच्या रुग्णालयात स्वाइन फ्लूशी लढण्यासाठी यंत्रणा तयार असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यानी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबईमध्ये पालिकेच्या आणि खाजगी रूग्णालयात २३ रुग्ण आढ़लले आहेत. त्या पैकी १० रुग्ण मुंबईमध्ये राहणारे आहेत, तर १३ रुग्ण मुंबई बाहेरून उपचारासाठी आले होते. अद्याप मिळालेल्या एकूण २३ रुग्णांपैकी १२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत ३ रुग्णांना उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे तर ४ रुग्णांवर ओपीडी मध्ये उपचार सुरु असल्याचे संजय देशमुख यानी सांगितले
मुंबई मध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण आढ़ळल्याने मुंबई महानगर पालिकेची ३ वैद्यकीय विद्यालये व १८ रुग्णांलये सज्ज ठेवण्यात आली असून प्रतेक रुग्णांलयात २ व्हेंटीलेटर राखीव ठेवण्यात आली आहेत. कर्मचार्याना प्रशिक्षण देण्यात येत असून औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. रुग्णांच्या तपासण्या कस्तुरभा रुग्णालय, हाफकिन आणि खाजगी प्रयोगशाळेत करण्याची सुविधा असल्याने पुण्याला तपासणी साठी नमूणे पाठण्याची गरज भासणार नाही असे देशमुख यानी सांगितले.
मुंबईकर नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, श्वास घेण्यात त्रास जाणवल्यास त्वरित रुग्णांलयात किंवा जवळच्या डॉक्टरकडून उपचार करून घ्यावेत. घरी उपचार करू नयेत. हा आजर हवेतून पसरत असल्याने गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. पालिकेने यासाठी २४११४००० ही हेल्पलाईन सुरु केली असून या हेल्पलाईन वर संपर्क साधावा असे आवाहन देशमुख यानी केले,
