मुंबई । प्रतिनिधी - मुंबईची दूसरी लाइफलाइन असलेल्या बेस्टच्या बसेसची अवस्था अत्यंत वाईट आहे. बसेसची स्वच्छता राखली जात नसल्याचा मुद्दा बेस्ट समिती सदस्य केदार होम्बालकर यांनी हरकतीच्या मुद्याद्वारे उपस्थित केला.
बसवर धुळ साचली असते.प्रवाश्यांचे कपडे ख़राब होतात. बस धुतल्या जात नाहीत असे होम्बालकर यानी समीतीच्या निदर्शनास आणले. यावर बोलताना बेस्टची छबी ख़राब होत असल्याचे शिवाजी सींग यानी म्हटले. बस प्रवर्तनाची माहिती आधी समिती सभे पुढे सादर केली जायची आता ही तुलनात्मक माहीती सादर केली जात नसल्याने बेस्टची खरी परिस्थिती समोर येत नाही. कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने बेस्टच्या स्वछतेकड़े दुर्लक्ष होत असल्याचे सुनील गणाचार्य यानी सांगीतले.
तर बेस्ट च्या या स्थितीला व्हर्ब कंपनी जबाबदार असल्याचा आरोप सुहास सामंत यानी केला. बेस्ट समिती अध्यक्ष श्रीकांत कवठणकर बेस्टची पत राखण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. परिवहन विभागाची आकडेवारी सादर करावी. स्वच्छ बसेस प्रवाश्यांच्या सोयीसाठी रस्त्यावर आणाव्यात असे आदेश देतहरकतीचा मुद्दा राखून ठेवला.
