काॅम्रेड गाेविंद पानसरे यांचे निधन - रविवारी महाराष्ट्र बंद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

काॅम्रेड गाेविंद पानसरे यांचे निधन - रविवारी महाराष्ट्र बंद

Share This
मुंबई - काॅम्रेड गाेविंद पानसरे यांचे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान फुप्फुसात रक्तस्राव झाल्यामुळे शुक्रवारी रात्री उशिरा १०.४५ वाजेच्या सुमारास निधन झाले. जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. तात्याराव लहाने यांनी ही माहिती दिली. मृत्युसमयी ते ८२ वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव शनिवारी सकाळी कोल्हापूरला नेण्यात येणार असून तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान पानसरे यांच्यावरील हल्याचा निषेध म्हणून रविवारी महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आल्याचे कॉ. भालचंद्र कांगो यांनी पत्रकारांना सांगितले.
पानसरे आणि त्यांच्या सामाजिक कार्यकर्त्या पत्नी उमा यांच्यावर कोल्हापुरात 16 फेब्रुवारी रोजी अज्ञात हल्लेखाेरांनी गाेळ्या झाडल्या हाेत्या.तीन गोळ्या लागून पानसरे गंभीर जखमी झाले होते. काेल्हापुरातील अॅस्टर अाधार रुग्णालयात त्यांच्यावर तीन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या होत्या. गेले तीन दिवस त्यांच्या फुप्फुसाला आलेली सूज कमी होत नसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र प्रकृतीत फारशी सुधारणा हाेत नसल्याने पानसरे यांना शुक्रवारी सायंकाळी एअर अॅम्ब्युलन्सद्वारे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात हलविण्यात अाले हाेते. या रुग्णालयात डाॅ. वूडवाडिया हे पानसरेंवर उपचार करत हाेते. रात्री पावणेदहाच्या सुमारास त्यांच्या फुप्फुसात रक्तस्राव वाढून श्वसननलिका बंद पडली. ती तातडीने बदलण्यात आली. मात्र फुप्फुसातील रक्तस्रावामुळे त्यांचा श्वास आणि हृदयक्रिया बंद पडली. डॉक्टरांनी तासभर शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांना वाचवण्यात यश आले नाही.


कॉ. गोविंद पानसरे यांना अखेरचा लाल सलाम; विवेकाची लढाई अखेर शांत झाली

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages