मुंबईत स्वाईन फ्ल्यूचा आणखी एक बळी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत स्वाईन फ्ल्यूचा आणखी एक बळी

Share This
मुंबई : 'स्वाईन फ्ल्यू'मुळे कस्तुरबा रुग्णालयातील ५८ वर्षांच्या वृद्ध रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे राहणारा होता. त्याच्यावर ३ फेब्रुवारीपासून कस्तुरबात उपचार सुरू होते. 'स्वाईन फ्ल्यू'मुळे दगावलेल्या रुग्णांची संख्या आता पाच झाली आहे. 'स्वाईन फ्ल्यू'चे आणखी सहा रुग्ण वाढले आहेत. 

गुरुवारी दुपारपर्यंत 'स्वाईन फ्ल्यू' रुग्णांची संख्या २३ होती. त्यापैकी मुंबईबाहेरील चारजणांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी मुंबईतील पाच आणि मुंबईबाहेरील एक असे एकूण सहा रुग्ण 'स्वाईन फ्ल्यू' बाधित आढळले आहेत. मुंबईबाहेरील एकूण रुग्णांची संख्या २९ झाली असून त्यापैकी पाचजण दगावले आहेत. 'स्वाईन फ्ल्यू'चा प्रादुर्भाव वाढल्याने मुंबईकर चिंतीत झाले असून 'स्वाईन फ्ल्यू'चा रुग्ण आढळल्यास यासंबंधी त्वरित माहिती देण्याचे आवाहन महापालिका आरोग्य विभागाने खाजगी डॉक्टर आणि रुग्णालयांना केले आहे. महापालिकेने हाफकीन इन्स्टिट्यूट, एसआरएल लॅब, कस्तुरबा रुग्णालयात 'स्वाईन फ्ल्यू' चाचणीसाठी सुविधा उपलब्ध केली आहे. 'स्वाईन फ्ल्यू'संदर्भात अधिक माहिती व मदतीसाठी 0२२-२४११४000 या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages