मुंबई : येत्या १ एप्रिलपासून संपूर्ण रेल्वेत प्लॅटफॉर्म तिकीटही पाच रुपयांनी महागणार असून, प्रवाशांना १0 रुपये मोजावे लागतील. विशेष म्हणजे, मेळा, रॅली आदी प्रसंगी प्रवाशांच्या गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी फलाट तिकिटांचे दर १0 रुपयांपेक्षाही जादा आकारण्याचे अधिकार रेल्वे बोर्डाने संपूर्ण देशातील विविध विभागांच्या व्यवस्थापकांनाही (डीआरएम) दिले आहेत.
पाच रुपयांचे फलाट तिकीट दर १ एप्रिलपासून वाढणार असल्यामुळे सर्व 'डीआरएम'नी १0 रुपयांची तिकिटे त्वरित छापून घ्यावीत, सध्याचा साठा जास्त असेल तर त्यावर पाच रुपयांचा स्टॅम्प मारून ती सुधारित दरांची तिकिटे प्रवाशांना जारी करावीत, असे आदेश रेल्वे बोर्डाच्या प्रवासी विपणन संचालकांनी देशातील सर्व झोन्सच्या महाव्यवस्थापकांना, मुख्य वाणिज्य व्यवस्थापकांना दिले आहेत.