सत्ताधारी सेना-भाजपाने जास्त विकासनिधी लाटला - देवेंद्र आंबेरकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 March 2015

सत्ताधारी सेना-भाजपाने जास्त विकासनिधी लाटला - देवेंद्र आंबेरकर

मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी एकट्यानी सर्वाधिक १३ कोटी ६0 लाखांचा विकास निधी तर सभागृह नेत्या तृष्णा विश्‍वासराव यांनी ६ कोटी १0 लाख रुपयांचा विकासनिधी आपल्याविभागासाठी वळवला आहे. सत्ताधारी शिवसेना-भाजपाच्या काही मोजक्या नगरसेवकांनी जास्त निधी 'लाटला' आहे. ४00 कोटींपैकी २२७ कोटी २२७ नगरसेवकांना एक कोटी रुपये याप्रमाणे वाटले आहेत. उर्वरित १७३ कोटींपैकी जास्त निधी सेना व भाजपाने स्वत:च्या पक्षाच्या नगरसेवकांसाठी वाटून घेतला आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केला आहे. 

आंबेरकर यांनी सर्वात जास्त निधी लाटणाऱ्या नगरसेवकांची एक यादी सादर केली असून यामध्ये दिनेश पांचाळ : एक कोटी १0 लाख, रमाकांत रहाटे : एक कोटी १0 लाख, डॉ. अनुराधा पेडणेकर : एक कोटी १0 लाख, किशोरी पेडणेकर : एक कोटी १0 लाख, भाजपाचे विनोद शेलार (अध्यक्ष शिक्षण समिती) : दोन कोटी ४५ लाख, भाजपा गटनेते मनोज कोटक : दोन कोटी ४0 लाख, रितू तावडे: एक कोटी ९0 लाख, विठ्ठल खरटमोल : दीड कोटी, भाजपाचे माजी गटनेते : एक कोटी ४५ लाख, राजेश्री शिरवडकर : एक कोटी ३0 लाख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सईदा खान : तीन कोटी ४0 लाख, अपक्ष मनोज संसारे : दोन कोटी ११ लाख, अपक्ष विष्णू गायकवाड : एक कोटी ६0 लाख रुपये स्वत:कडे वळवले आहेत, असा आरोप आंबेरकर यांनी केला आहे. विकासनिधीच्या मुद्दय़ावरून गेले पाच दिवस पालिका सभागृहात झालेल्या गोंधळास केवळ काँग्रेस जबाबदार नाही, विकास असमान वाटप करणारी सेना व भाजपाही जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. सभागृहात जो गोंधळ झाला याला या गोंधळाबद्दल आंबेरकर यांनी मुंबईकरांची क्षमाही मागितली आहे.

Post Bottom Ad