मुंबईत ५ वर्षांत टीबीचे १ लाख ६0 हजार रुग्ण - १० हजार रुग्णांचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 March 2015

मुंबईत ५ वर्षांत टीबीचे १ लाख ६0 हजार रुग्ण - १० हजार रुग्णांचा मृत्यू

मुंबई : मुंबईत गेल्या पाच वर्षांत टीबीचे एक लाख ६0 हजार रुग्ण आढळले आहेत. यामध्ये २00८ ते २0१४ या कालावधीत टीबीचे एकूण १0 हजार १३९ रुग्णांचा मृत्यू झाला असून 'एमडीआर' या जीवघातक टीबी रुग्णांचाही समावेश आहे. मुंबईत दरवर्षी सरासरी टीबीचे सरासरी ३0 हजार रु ग्ण आढळून येत आहेत, असे पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे तज्ज्ञ डॉ. अरुण बामणे यांनी सांगितले. 

२0१0 मध्ये २९ हजार ६८५, २0११ मध्ये २९ हजार २१२, २0१२ मध्ये ३0 हजार ८२८, २0१३ मध्ये ३१ हजार ७८९ आणि २0१४ मध्ये ३१ हजार २0७ असे एकूण एक लाख ५२ हजार ७२१ सर्वसाधारण टीबीचे तसेच एमडीआर आणि एक्सडीआरचे १0 हजार 00२ रुग्ण आढळले आहेत. २0१0 ते जानेवारी २0१५ पर्यंत एमडीआरचे नऊ हजार ३७५ व एक्सडीआरचे ६२७ रुग्ण आढळले आहेत. २00८ मध्ये ११५४, २00९ मध्ये १२७४, २0१0 मध्ये ११८५, २0११ मध्ये १२४६, २0१२ मध्ये १३८९, २0१३ मध्ये १३९३, २0१४ मध्ये १३३४ असे एकू ण ८९७५ रुग्ण टीबीमुळे दगावल्याचे डॉ. बामणे म्हणाले. एमडीआर टीबीने आतापर्यंत मुंबईत ११४४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, यात मुंबईतील ९७८ रुग्णांचा व मुंबईबाहेरील १६६ रुग्णांचा समावेश आहे.

टीबी रुग्णांसाठी पालिकेची 'ई औषध' व्हाऊचर सेवा
मुंबई : टीबी रुग्णांना 'ई व्हाऊचर' सेवेद्वारे मोफत औषधे आणि खाजगी रुग्णालयांमध्ये अनुदानित दराने सेवा मिळावी, यासाठी मुंबई पालिकेने 'ई औषध व्हाऊचर' ही मोहिम सुरू केली आहे. पालिका आयुक्त आयुक्त सीताराम कुंटे यांच्या हस्ते सोमवारी या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यासाठी पालिकेने १८00१0३८७0१ हा टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे.

योग्य निदान व उपचार सुविधा खाजगी व्यावसायिकांमार्फत उपलब्ध करून देण्यासाठी 'पब्लिक प्रायव्हेट इंटरफेस एजन्सी'तर्फे या प्रकल्पाची मुंबईत सुरुवात झाली आहे. प्राथमिक टीबी विरोधी औषधोपचारदेखील रुग्णांना मोफत देण्यात येणार आहेत. हा प्रकल्प सेवा कागदी सेवा पावतीच्या माध्यमातून गेले सहा महिने देत असून यामार्फत चार हजार रुग्णांवर उपचार केले आहेत. निदान व औषधोपचारांसाठी या संस्थांमार्फत ५७ लाख रुपये खर्चण्यात आले आहेत. 

आतापर्यंत एक हजार ३८९ खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे प्रशिक्षण झाले आहे. चार जीन एक्स्पर्ट प्रयोगशाळा, ८८ रुग्णालये व ९२ औषध विक्रेते यांचा सहभाग करून घेण्यात आला आहे. पालिकेने क्षयरोग नियंत्रणासाठी जोरदार पावले उचलली असून अमिताभ बच्चन यांना टीबी नियंत्रणासाठी व प्रबोधनासाठी ब्रँड अँम्बेसेडर केले आहे. लघुपट व जाहिरातींद्वारे टीबीविषयी प्रबोधन केले जात आहे. 'ई औषध' मोफत व्हाऊचर मोहिमेची डॉ. पद्मजा केसकर व डॉ. अरुण बामणे यांनी सविस्तर माहिती दिली.या योजनेमुळे टीबी नियंत्रणात येईल, असा दावा सीताराम कुंटे यांनी या वेळी केला.

Post Bottom Ad