मार्च महिन्याचे निवृत्तीवेतन एप्रिलमध्ये उशिरा मिळणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 March 2015

मार्च महिन्याचे निवृत्तीवेतन एप्रिलमध्ये उशिरा मिळणार

मुंबई, दि. २६ : बँकांना एप्रिलमध्ये असलेल्या विविध सुट्टयामुळे निवृत्तीवेतन धारकांना मार्चचे निवृत्तीवेतन उशिराने मिळणार आहे. 

बृहन्मुंबई कार्यक्षेत्रातील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटूंब निवृत्तीवेतनधारक यांना प्रती वर्षी मार्चचे निवृत्तीवेतन एप्रिलच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी म्हणजे २ एप्रिल रोजी करण्यात येते. चालू वर्षी दि. १ एप्रिल रोजी, वित्तीय लेखे पुर्ण करण्याच्या उद्देशाने बँकांचे आर्थिक व्यवहार बंद राहील. तसेच दि. २ एप्रिल रोजी महावीर जयंती व ३ एप्रिल रोजी गुड फ्रायडे निमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने निवृत्तीवेतन प्रदानाची माहिती रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे सादर करता येत नाही. दि. ४ एप्रिल रोजी  निवृत्तीवेतन प्रदानाची माहिती भारतीय रिजर्व्ह बँकेकडे पाठविण्यात येईल. त्यामुळे निवृत्तीवेतनाचे प्रदान निवृत्तीवेतन धारकांना उशिरा मिळणार आहे, याची नोंद घ्यावी, असे अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई यांनी कळविले आहे.

Post Bottom Ad