मुंबई दि. 10 (प्रतिनिधी) – मुंबईत म्हाडाच्या घरांमध्ये ५१ जणांनी घुसखोरी केल्याचे उघड झाल्याचे या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी विधानसभेत आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.
मुंबईतील म्हाडाच्या संक्रमण शिबिरात राहणाऱ्या रहिवाश्यांना घरे देण्यासाठीची मास्टर लिस्ट तयार करण्यात येते आहे काय ? तसेच यामध्ये काही अर्जदार अपात्र व बोगस असल्याचे उघड झाले आहे काय ? असा तारांकित प्रश्न भाजपा आमदार अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत विचारला होता. त्याला दिलेल्या लेखी उत्तरात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सांगितले की म्हाडाच्या संक्रमण शिबिरात राहणाऱ्या रहिवाश्यांना घरे मिळवीत याबाबतची मास्टर लिस्ट तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये ५१ गाळेधारकांची कागदपत्रे संशयास्पद आढळली असून त्यांची चौकशी मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येत असून या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
