ताडदेव येथे पोलिसांना 62 घरे मिळणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ताडदेव येथे पोलिसांना 62 घरे मिळणार

Share This
मुंबईदि 10 - ताडदेव येथील शासकीय मालकीच्‍या भूखंडावरील झोपडपट्टीचा पुर्नविकास करताना पोलिस घरांसाठी या जागेवर आरक्षण असल्‍यामुळे या जागी पोलिसांसाठी    62 सदनिका उपलब्‍ध करून देण्‍यात येतीलअशी ग्‍वाही गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी विधानसभेत दिली

मुंबईतील ताडदेव येथील भूखंड क्र 725   या शासकीय भूखंडावरील झोपडपट्टीचा पुर्नविकास करताना या जागी पोलिस वसाहतीचे आरक्षण असल्‍यामुळे त्‍या जागेवर पोलिसांसाठी घरे उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहे कायअसा तारांकित प्रश्‍न भाजपा आमदार अॅड आशिष शेलार यांनी विधानसभेत विचारला होता. त्‍यावर गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी दिलेल्‍या लेखी उत्‍तरात सांगितले की,  विकास नियंत्रण नियमावली 1991 33(10) नुसार  आरक्षणाच्‍या  25 टक्‍के क्षेत्र पोलिस हौसिंगसाठी उपलब्‍ध होत असून त्‍यामध्‍ये पोलिसांसाठी स्‍वतत्र इमारत बांधण्‍यात येणार आहे. या इमारतीमध्‍ये 41.88 चौ.मी. ची  62घरे उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहेत. हे बांधकाम पोलिस विभागाला मोफत करून देण्‍याचे विकास नियंत्रण नियमावलीमध्‍ये प्रस्‍तावित असून याबाबतचे आराखडे पोलिसांच्‍या गृहनिर्माण विभागाने मंजूर करण्‍याची प्रक्रिया सुरू असल्‍याचे ही त्‍यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages