निवासी वस्त्या, शाळा, क्रीडांगणे आणि रुग्णालयांच्या जवळ मोबाइलचे टॉवर्स उभारता कामा नयेत. या टॉवर्सवर बंदी घातली पाहिजे, अशी स्पष्ट शिफारस मंत्र्यांच्या अंतर्गत समितीने केली असतानाही, हे महत्त्वाचे निकष धाब्यावर बसवून महापालिकेने 'रिलायन्स'च्या 'फोर जी'ला मोबाइल टॉवर्स उभारण्याची अनुमती दिलीच कशी, असा सवाल मुंबई भाजपाचे सरचिटणीस विवेकानंद गुप्ता यांनी पालिकेच्या आयुक्तांना केला आहे. या पत्रामुळे 'रिलायन्स'च्या मोबाइल टॉवर्सला भाजपाचा विरोध असल्यामुळे टॉवर्सचे भवितव्य अंधारात आहे.
'आयएमसी'ने याबाबतचा वैज्ञानिक अभ्यास केला असून याविषयी 'टेलिकॉम इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन' (टेमा), 'सेल्यूलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया' (सीओएआय), 'टेलिकॉम युर्जस ग्रुप ऑफ इंडिया,' बंगळुरू येथील 'कन्झ्युमर केअर सोसायटी' (सीसीएस), आयआयटी मुंबईचे प्रा. गिरीश कुमार यांच्याशी चर्चाही केली आहे. 'हे मोबाइल टॉवर्स शहरी आणि ग्रामीण भागात आणि ग्रामीण भागातील वन क्षेत्रात उभारल्यास त्याचा पक्षी, मधमाशी आणि अन्य वन्य जीवनावर काय परिणाम होईल, याचा अभ्यास करण्यासाठी वन आणि पर्यावरण मंत्रालयाने (वन्यजीव विभाग) समितीही नेमली आहे. ही समिती सर्वंकष अभ्यास करून त्याचा अहवाल या मंत्र्यांच्या समितीला देणार आहे.