पालिकेतही विरोधी पक्षनेते, गटनेते बदलणार? - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेतही विरोधी पक्षनेते, गटनेते बदलणार?

Share This
मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष बदलल्यानंतर 'बदलाचे वारे' लवकरच मुंबई महापालिकेच्या दिशेने वाहणार आहेत. पालिकेतील विरोधी पक्षनेते आणि गटनेते बदलण्याची चिन्हे आहेत. विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर हे माजी खासदार गुरुदास कामत यांचे चेले असल्यामुळे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय निरुपम या पदावर त्यांच्या मर्जीतील नेता बसवणारच, अशी चर्चा सुरू आहे. यामध्ये महिला आघाडीच्या अध्यक्षा शीतल म्हात्रे किंवा नगरसेविका गीता यादव यांना ही संधी मिळू शकेल, असे बोलले जाते. 

पालिकेतील विद्यमान सभागृह नेत्या तृष्णा विश्‍वासराव यांच्या पदावर माजी महापौर श्रद्धा जाधव यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा पालिका मुख्यालयात बर्‍याच दिवसांपासून सुरू आहे. 'कमळ' सोडून 'हात' धरणार्‍या प्रवीण छेडा किंवा समाजवादीतून काँग्रेसमध्ये आलेले मोहसीन हैदर यांचीदेखील नावे विरोधी पक्षनेतेपदाच्या चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्याचे गटनेते यांचीही उचलबांगडी होण्याची शक्यता व्यक्त होत असून त्यांची जागा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या भगिनी नगरसेविका डॉ. सईदा खान यांना दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages