नरिमन पॉईन्ट येथील झोपडपट्टीवर कारवाई दरम्यान दोघांचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नरिमन पॉईन्ट येथील झोपडपट्टीवर कारवाई दरम्यान दोघांचा मृत्यू

Share This
आझाद मैदानात आमरण उपोषण सुरु 
मुंबई / प्रतिनिधी - नरिमन पॉईन्ट मनोरा आमदार निवासाच्यामागील बाजूस असलेली महात्मा फुले नगर झोपडपट्टी कलेक्टर आणि बिल्डर यांच्याकडून तोडताना एका महिलेचा तसेच एका ४ दिवसीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या तोडक कारवाई दरम्यान झालेली धक्काबुक्की आणि झोपडपट्टीधारकांत निर्माण झालेल्या भीती यामुळे रहिवाश्यामध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. संतप्त अश्या झोपडीधारकांनी रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात २६ मार्च पासून आमरण उपोषण सुरु केले असल्याचे राजू काळे यांनी सांगितले. 

नरिमन पॉईन्ट मनोरा आमदार निवासाच्या मागील बाजूस गेले २२ वर्षे महात्मा फुले नगर हि झोपडपट्टी आहे. येथील ३८० झोपडपट्टीधारकांकडे वीज बिल, रेशनिंग कार्ड इत्यादी पुरावे आहेत. तसेच यांची मतदान यादी मध्ये नवे सुद्धा समाविष्ठ आहेत. तरीही कलेक्टर आणि बिल्डर यांनी संगनमत करून या झोपड्या २९ डिसेंबर २०१४ रोजी तोडल्या आहेत.झोपडपट्टीमधील घरे तोडताना घोर फसवणूक झाल्याने महात्मा फुले नगर झोपडपट्टी तोडली त्याच ठिकाणी पुनर्वसन करावे, एस.आर.ए.च्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या बिल्डरवर कारवाई करावी, झोपडपट्टीतील ३८० घरे पाडताना दागिने, किंमती सामान, अन्नधान्य याचे कलेक्टर यांच्या मार्फत मूल्यमापन करून नुकसान भरपाई द्यावी, आपली घरे अधिकृत असताना का तोडता असे विचारून कारवाई करण्यास विरोध केला म्हणून द्वारकाबाई काळे, विष्णू चव्हाण व आणखी एक व्यक्ती पोलिसांच्या जबर मारहाणी मुळे जखमी झाले आहेत. त्यांच्यावरील केसेस त्वरित मागे घ्याव्यात इत्यादी मागण्यांसाठी आमरण उपोषण करत असल्याची माहिती राजू काळे व मुत्तू स्वामी यांनी दिली आहे. राज्य सरकार जो पर्यंत न्याय देत नाही तो पर्यंत हे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे काळे यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages