मुंबई महानगर पालिका सभागृहात राडा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई महानगर पालिका सभागृहात राडा

Share This
पलिकेला काळीम्बा फासणारी घटना
महिला नगरसेविका गटनेत्याना सभागृहात जाण्यापासून रोखले
मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबई महानगर पालिकेमधे काळीम्बा फासणारी घटना गुरुवारी घडली आहे. पालिका सभागृहात जाणाऱ्या नगरसेवक आणि गटनेत्याना सुरक्षा रक्षकानी अडवले तर काही नगरसेवकाना मारहाण करण्यात आली. सदर घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. 

मुंबई महानगर पालिकेमधे सभागृहात दोन दिवस चाललेल्या गोंधळानंतर कोंग्रेसच्या 6 नगरसेविकांना निलंबित करण्यात आले आहे. विरोधी पक्ष नेत्यानी सभागृहात दिलगीरी व्यक्त केल्यावर या नगरसेविकाचें निलंबन मागे घेवु असे आश्वासन महापौर स्नेहल आंबेकर यानी दिले. परंतू सभागृहात विरोधी पक्ष नेते देवेन्द्र आंबेरकर यानी दिलगीरी व्यक्त केल्यावर महापौर निलंबन मागे घेण्यात टालाटाळ करत वेग वेगळी वक्तव्य करू लागल्या. सभागृहात घडलेल्या घटनेबाबत महापौर मात्र माझ्या दालनात येवून नगर सेविकानी माफ़ी मागावी अशी वक्तव्य  करू लागल्याने विरोधी पक्षातील नगरसेवकामध्ये संतापाची लाट पसरू लागली. त्यातच सभागृहात स्वाइन फ्लू वर चर्चा करताना मनसेचे दिलीप लांडे यानी ज्या राज्यात स्वाईन फ्लू पसरला आहे त्या राज्यात भाजपाचे एनडीएचे सरकार आहे. भाजपाचे सरकार स्वाइन फ्लू रोखण्यात अपयशी ठरल्याचे वकतव्य केल्याने भाजपाच्या सद्स्यानी गोंधळ घातला. यामुळे महापौरानी सभागृह 10 मिनिटासाठी तहकूब केले.

सभागुह तहकूब केल्या नंतर निलंबित नगरसेविकानी सभागृहात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी निलंबित नगरसेविका, आणि सुरक्षा रक्षक यांच्या मध्ये झालेल्या झटापाटित महिला नगरसेविकांचे केस ओढून मारहाण करण्यात आली. नगरसेविकांचे मंगळसूत्र ओढण्यात आले. सुरक्षा रक्षकानी इतर नगरसेवक , गट नेते यानाही सभागृहात जाण्या पासून रोखले. त्यातच पोलिस सभागृहाबाहेर आल्याने पोलिस आणि नगरसेवकांची चकमक झाली आणि नगरसेवकांनी निषेध नोंदवत पोलिसांना पालिका इमारती बाहेर पिटाळून लावले. पुन्हा सभागृह सुरु झाल्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यानी हरकतीच्या मुद्याद्वारे सुरक्षा रक्षाकानी नगरसेवकाना केलेल्या मारहाणीकड़े सभागृहाचे लक्ष वेधले असता महापौर स्नेहल आंबेकर यांनी या प्रकरणाची आयुक्तांच्या वतीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.


























Post Bottom Ad

JPN NEWS

Pages