मुंबई- बेस्टचा विद्युत व परिवहन विभाग १ एप्रिलपासून मुंबईकरांना भाडेवाढीचा जबरदस्त शॉक देणार आहे. फेब्रुवारीनंतर आता एप्रिलपासून बेस्ट बसच्या तिकीट दरात १ ते १६ रुपयांनी वाढ होणार आहे तर वीज दरात ८ ते १० टक्के वाढ होणार आहे. यामुळे मुंबईकरांचे आता एप्रिल पासून ‘बुरे दिन’ सुरू होणार असून याचा फटका ४० लाख प्रवासी रोज प्रवास करतात. तर १० लाख वीज ग्राहकांना बसणार आहे.
नियोजनाअभावी होणारी तूट भरून काढण्यासाठी बेस्ट परिवहन विभागाने थेट ग्राहकांच्या खिशात हात घातला आहे. १ एप्रिलपासून बेस्ट बसच्या तिकिटात १ ते १६ रुपयांनी वाढ होणार आहे. प्रवाशांना सात रुपयांऐवजी आठ रुपये मोजावे लागणार आहेत. तर वीज बिलातही ८ ते १० टक्के वाढ होणार आहे. वीज दरवाढही १ एप्रिलपासूनच लागू होणार असल्याने मुंबईकरांना एप्रिल महिन्यात डबल झटका सहन करावा लागणार आहे
एक एप्रिपासून लागू होणारी वीज दरवाढ
० ते १०० प्रतियुनिट ३.९३ रु.
१०० ते ३०० प्रतियुनिट ८.१६ रु.
३०० ते ५०० प्रतियुनिट ११.२९ रु.
५०० ते १००० प्रतियुनिट १३.९९ रु.
एक एप्रिपासून लागू होणारी बस भाडेवाढ
किलो मीटर दर
२ ८ रु
४ १० रु
६ १४ रु
१० १८ रु
१४ २२ रु
२० २६ रु
३० ३० रु
४० ४२ रु
