मुंबईत मोफत वायफाय सुविधा सुरू करा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत मोफत वायफाय सुविधा सुरू करा

Share This
मुंबई  दि 3 (प्रतिनिधी)  मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर बनविण्‍याच्‍या दृष्‍टीने केंद्र आणि राज्‍य सरकार विविध उपाययोजना करीत आहे. यातील एक भाग म्‍हणून शहराचीकनेक्टीव्हिटी वाढविण्‍याच्‍या द्ष्‍टीने शहरात मोफत वायफाय सेवा उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या दृष्‍टीने राज्‍याच्‍या सन 2015-16 च्‍या अर्थसकल्‍पात आवश्‍यक ती आर्थिक तरतूद करण्‍यात यावी अशी मागणी  आमदार अॅड आशिष शेलार यांनी  आज वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार  यांची भेट घेऊन केली. 


मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईत दरवर्षी  सुमारे 55 लाख परदेशी प्रवासी येतात. तर मुंबईत राज्‍यातून येणा-या पर्यटकांची संख्‍याही मोठी आहे. तसेच मोबाईल वापरणार-यांची संख्‍याही सर्वात जास्‍त असून शहरातील सार्वजनिक ठिकाणी मोफत वायफाय सुविधा उपलब्‍ध करून दिल्‍यास जगाशी हे शहर जोडले जाईलच शिवाय मोबाईल कने‍टीव्हिटीचा वापर करून भविष्‍यात महिला सुरक्षेबाबतही उपाययोजना पोलिस आणि इतर शासकीय यंत्रणेला करता येऊ शकतात. आज तरूण आणि विद्यार्थ्‍यांसाठी इंटरनेट हे ज्ञानार्जनाचे आणि संवाद साधण्‍याचे प्रभावी  साधन झाले आहे. त्‍यामुळे त्‍यांना मोफत वायफाय सेवा ही सुविधा उपयुक्‍त ठरू शकते. अशी तरूणांचीही मागणी  आहे
मुंबईतील उपनगरीय रेल्‍वे स्‍टेशनवर वायफाय सुविधा उपलब्‍ध करून देण्‍याचा निर्णय नुकातच रेल्‍वे अर्थसंकल्‍पात रेल्‍वे मंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केला आहे.  राज्‍य शासनानेही मुंबईती मैदानेरस्‍ते,  कॉलेज आणि परिसरशासकीय कार्यालयेगार्डन महापालिका कार्यालयेहॉस्पिटल या परिसरात  मोफत वायफाय सेवा उपलब्‍ध करून देण्‍यात यावी अशी मागणी  या शिष्‍टमंडळाने आज केली त्यावर सरकार  सकारात्मक  विचार करीत  असल्याचे वित्त  मंत्र्यांनी  सांगितले. या शिष्टमंडळात युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश पांडेअमोल जाधव आणि  महाविद्यालयाच्‍या  तरूणांचा समावेश  होता

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages