मुक्त विद्यापीठाचा शिवाजी विद्यापीठाशी सामंजस्य करार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुक्त विद्यापीठाचा शिवाजी विद्यापीठाशी सामंजस्य करार

Share This
पदव्युत्तर शिक्षणक्रम नव्याने सुरु होणार
नाशिक :यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या शैक्षणिक कराराद्वारे मुक्त विद्यापीठाचे एम.ए.     (मराठी, हिंदी व इंग्रजी) आणि एम.एस्सी. (गणित) हे पदव्युत्तर शिक्षणक्रम सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात येणार आहे.  


मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.जे. पवार यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत मुक्त विद्यापीठाचे काही शिक्षणक्रम शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्रामार्फत राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आला. करारावर दोन्ही विद्यापीठाच्या कुलगुरूंनी स्वाक्षऱ्या केल्या. 

या वेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी. व्हि. मुळे, वित्त अधिकारी व्हि. टी. पाटील, कोल्हापूर विभागीय केंद्राचे संचालक डॉ. भालबा विभूते, मुक्त विद्यापीठाचे सहायक कुलसचिव निखील ताम्हणकर आदी उपस्थित होते. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे एम.ए. आणि एम.एस्सी. पदव्युत्तर शिक्षणक्रमांस प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे मत कुलगुरू डॉ. साळुंखे यांनी व्यक्त केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages