प्रक्षोभक विधाना प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना जामीन नामंजूर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्रक्षोभक विधाना प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना जामीन नामंजूर

Share This
मुंबई : धर्माच्या नावाखाली केल्या जाणार्‍या प्रक्षोभक विधानांविरोधात कठोर भूमिका घेत मुंबई उच्च न्यायालयाने हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांना जामीन नामंजूर केला. पुण्यात जमावाला भडकावल्याने झालेल्या हिंसाचारात २४ वर्षीय मुस्लिम तरुणाला प्राण गमवावा लागल्याप्रकरणी देसाईंना अटक झाली होती. न्यायालयाने प्रक्षोभक विधानावर बोट ठेवत देसाईंना जामीन मंजूर करण्यास स्पष्ट नकार दिला.
पुण्यातील हडपसरमध्ये मोहसीन शेख या मुस्लिम इंजिनीयरचा २ जून २0१४ रोजी ३0 ते ४0 जणांच्या टोळक्याने केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाला होता. शेखच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी धनंजय देसाईंना अटक केली होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आक्षेपार्ह छायाचित्रे सोशल मीडियात प्रसिद्ध झाल्याच्या मुद्दय़ावरून वाद उद्भवला होता. विशिष्ठ धार्मिक गटाचे नेतृत्व असल्याचा दावा करणार्‍या व्यक्ती दुसर्‍या धर्मावर टीका करतात. यामुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण होते, असे मत न्यायमूर्ती साधना जाधव यांनी धनंजय देसाईंना जामीन नाकारताना व्यक्त केले. मोहसीन शेखवर हल्ला करणार्‍या जमावामध्ये तसेच पुणे शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यामागे धनंजय देसाईंचा सहभाग नसल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला. 

परंतू अतिरिक्त सरकारी वकील अरफान सैत यांनी देसाईंचे प्रक्षोभक विधान तसेच अन्य परिस्थितीजन्य पुराव्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. शिवाजी महाराजांच्या बदनामीकारक प्रतिमा सोशल मीडियात अपलोड केल्याच्या संशयावरून मुस्लिम समाजातील लोकांवर हल्ला करण्यास देसाईंनी सांगितल्याचे ज्या साक्षीदारांनी ऐकले होते, त्या दोन साक्षीदारांच्या जबानी न्यायमूर्ती जाधव यांनी निर्णय देताना विचारात घेतल्या. मोहसीन शेखवर धनंजय देसाईंच्या सांगण्यावरून हल्ल्याचा कट रचला गेल्याचे साक्षीदारांच्या जबानीवरून स्पष्ट होते व हे जामीन नाकारण्यास पुरेसे कारण असल्याचे मत न्यायमूर्ती जाधव यांनी या वेळी व्यक्त केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages