मुंबई : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने तब्बल ७ वर्षां कालावधीनंतर शहराच्या सुरक्षिततेसाठी ६ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला. हे कॅमेरे बसवण्याचे काम 'लार्सन अँण्ड टुब्रो' कंपनीला देण्यात आले आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने एकूण ९५0 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. हे कॅमेरे कोणत्या ठिकाणी बसवण्यात यावेत, याचा एक आराखडा मुंबई पोलीस व 'एलएनटी' कंपनीच्या तज्ज्ञांनी तयार केला असून त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेला सादर करण्यात आला आहे.
दक्षिण मुंबईत एकूण १२00 कॅमेरे बसवले जाणार असून हे काम पावसाळय़ानंतर हाती घेतले जाणार असल्याचे सूत्राने सांगितले. झूम यंत्रणा बसवण्यात आलेले हे अत्याधुनिक कॅमेरे पोलिसांच्या वायरलेस यंत्रणेशी जोडण्यात येणार आहेत. खाजगी जागेवर खांब उभारून त्यावर हे कॅमेरे बसवले जाणार असून त्यासाठी महापालिकेची मदत घेतली जाणार आहे. शहराच्या सुरक्षिततेसाठी एकूण ६ हजार कॅमेरे बसवण्याचे हे काम या वर्षभरात पूर्ण केले जाणार असल्याचे सूत्राने सांगितले. कॅमेरे कोणकोणत्या ठिकाणी बसवण्यात यावेत, याचा एक आराखडा पोलीस व कंपनी अधिकार्यांनी तयार केला असून तो पालिकेच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. पालिकेने जागा उपलब्ध करून दिल्यास हे कॅमेरे बसवण्याचे काम पावसाळय़ानंतर हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी निधी मंजूर झाला असून या वर्ष अखेरीपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार असल्याचे सूत्राने सांगितले.