मोडकळीस आलेल्या मंडयांचा पुनर्विकासाच्या धोरणाला संमती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 March 2015

मोडकळीस आलेल्या मंडयांचा पुनर्विकासाच्या धोरणाला संमती

मुंबई : मोडकळीस आलेल्या मुंबईतील १२ मंडयांचा पुनर्विकासाचा मार्ग अखेर खुला झाला असून, पुनर्विकासाच्या धोरणाला महापालिका सभेत शुक्रवारी संमती देण्यात आली. याबाबतचे धोरण मंजूर झाल्याने संत सावता मंडई (भायखळा), डोंगरी, भुलेश्‍वर, आगर बझार (दादर), एसव्हीएस मंडई (माहीम), वीर संभाजी मंडई (भांडुप), दीनानाथ मंगेशकर मंडई (विलेपार्ले), सांताक्रुझ जेव्हीपीडी मंडई (अंधेरी), भाऊ लाड मंडई (वांद्रे पूर्व) आणि सर्मथ रामदास मंडई (वांद्रे पश्‍चिम) या मंडयांच्या पुनर्विकासाची कामे महापालिका लवकरच हाती घेणार आहे. 

मुंबईत ९२ मंडया मोडकळीस आल्या असल्या तरी त्यांच्या पुनर्विकासाचे धोरण नसल्याने पुनर्विकास रखडला आहे. ९२ पैकी १८ मंडया खाजगी मंडळींना दिल्या असून, २५ मंडयांचा विकास रखडला आहे आणि ४९ मंडयांचा पुनर्विकास टप्प्याटप्प्याने होणार आहे. पुनर्विकासाचे धोरण महापालिकेने तयार केल्यानंतर त्याला मंडयांच्या संघटनांनी न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने महापालिका व संघटनांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मंडयांचा विकास जुन्या धोरणानुसार करण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाच्या निर्देशानुसार या मंडयांचा पुनर्विकास करण्यात येणार असून, संबंधित मंडयांच्या पुनर्विकासाचे प्रस्ताव पालिकेच्या सुधार समितीसमोर मंजुरीसाठी मांडण्यात येतील, अशी माहिती सुधार समितीच्या अध्यक्षा उज्ज्वला मोडक यांनी दिली.

Post Bottom Ad