बेस्टच्या अधिकारी, कर्मचार्‍यांच्या वारसांना मिळणार मदत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्टच्या अधिकारी, कर्मचार्‍यांच्या वारसांना मिळणार मदत

Share This
मुंबई : बेस्ट उपक्रमातील मृत अधिकारी व कर्मचार्‍यांच्या वारसांना यापुढे चार लाखांची आर्थिक मदत मिळणार आहे. उपक्रमाने सुरू केलेल्या गट विमा योजनेतंर्गत १ सप्टेंबर २0१४ किंवा त्यानंतर मृत पावलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या वारसांना हा लाभ मिळणार आहे. 

पूर्वीच्या 'ईडीआयएल' योजनेतंर्गत १ एप्रिल २0१२ ते ३१ ऑगस्ट २0१४ या कालावधीत मृत पावलेल्या बेस्टच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या वारसांना दोन लाख ३२ हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. बेस्ट समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव संमत झाला. बेस्ट कर्मचार्‍यांच्या वेतन करारातून २२ कोटींची रक्कम शिल्लक राहिली होती. २२ कोटींच्या रकमेतून मृत अधिकारी व कर्मचारी यांच्या वारसांना एक लाखांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय बेस्टमधील बेस्ट वर्कर्स युनियन व बॉम्बे इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन यांच्या मान्यतेने झाला होता.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages