गटई कामगारांच्या स्टॉलवर कारवाई दरम्यान महापुरुषांच्या तसबिरीची विटंबना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 March 2015

गटई कामगारांच्या स्टॉलवर कारवाई दरम्यान महापुरुषांच्या तसबिरीची विटंबना

बोरिवली पश्‍चिमेस सिद्धार्थनगर, गणपती मंदिराजवळील एका गटई कामगाराचा स्टॉल पालिका अधिकार्‍याने मोडतोड करून नेला व मालाची नासधूस केली. या कारवाईदरम्यान महापुरुषांच्या तसबिरीची विटंबना केल्याचा आरोप अखिल भारतीय चर्मकार कृती समिती अध्यक्ष अनिल गायकवाड यांनी केला आहे. पालिकेच्या मनमनीविरुद्ध १३ एप्रिलला पालिकेवर मोर्चा काढून अधिकार्‍याचा जोरदार निषेध केला जाणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. 


बोरिवली येथे संजय सखाराम गुठले हे गेल्या २0 वर्षांपासून गटई करतात. पालिका अधिकारी शिर्के यांनी हा स्टॉल उचलून नेत त्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत रोहिदास महाराज यांच्या तसबिरीची विटंबना केली. त्याचबरोबर स्टॉल आणि मालाची नासधूस केली. याचा जाब विचारण्यास गेलेले भारतीय चर्मकार कृती समिती अध्यक्ष अनिल गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली, मात्र हजारो चर्मकार बांधव जमा होताच त्यांना सोडून देण्यात आले. पालिकेच्या मनमानीविरुद्ध व महापुरुषांच्या तसबिरीची विटंबना करणार्‍या आणि गटई कामगाराला जातीवाचक शिवीगाळ करणार्‍या अधिकार्‍यावर कठोर कारवाई करावी, अशी 

मागणी गायकवाड यांनी केली आहे. हजारो फेरीवाले राजरोसपणे रस्त्यावर पथार्‍या मांडून पालिकेला मॅनेज करतात. मात्र गटई कामगार रस्त्याच्या कडेला बसून लोकांची चरणसेवा करणार्‍या या कामगाराला त्रास देणार्‍या अधिकार्‍यावर कठोर कारवाई करावी अन्यथा आम्ही १३ एप्रिलला पालिकेवर धडक मोर्चा नेणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.


Post Bottom Ad