गरीबांची 'रोटी' चोरुन ,शेठ भरतोय तिजोरी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 March 2015

गरीबांची 'रोटी' चोरुन ,शेठ भरतोय तिजोरी

रायगड / 18 मार्च / रशिद इनामदार
गरीबांच्या तोंडचा घास चोरुन त्याची साठेबाजी करुन काळ्याबाजारात विक्री होते असा काळाबाजार करणार्या लखनशेठ पटेलच्या साम्राज्याला मनसे कार्यकर्त्यांमुळे सुरूंग लागला आहे 

16 मार्च च्या संध्याकाळी मनसे वाहतुक सेनेचे उपाध्यक्ष घंटानाद आंदोलन फेम महेश जाधव,जगदीश खांडेकर ,कार्यकारीनी सदस्य सुधिर नवले यांना या प्रकाराबद्दल माहिति मिळाली त्यांनी अधिक माहिति घेतल्यावर सरकारी गोडाउनमधुन निघालेला ट्रक खालापुरच्या दिशेने गेल्याचे कळले त्या ट्रक चा शोध घेत असताना सावरोली गावच्या हद्दीत त्या ट्रकमधील धान्याची पोती आढळुन आली मनसैनिकांनी तो माल दुसर्या दोन ट्रकात भरुन गोव्याला नेण्याचा प्रयत्न हाणुन पाडला त्या दोन ट्रकांना अडवून ठेवले व जिल्हाधिकारी सुमंत भांगे, स्थानिक पोलिसांना कळवले परीसराचा अंदाज घेतला असता शेजारीच जय फुड कॉर्पोरेशन ही कंपनी आढळुन आली त्या कंपनीत जाउन मनसैनिकांनी तपासुन पाहिले त्यात करोडो रुपयांचे रेशनिंग चे धान्य आढळुन आले व्यापारी लखन पटेल ला या प्रकाराबद्दल माहिति मिळाली त्याने स्थानिक राजकीय पक्षांच्या पदाधिकारी तसेच गावकर्यांची माथी भडकावून तिथे मनसैनिकांना रोखण्यासाठी पाठवून दिले वादावादी झाली वातावरण तनावपुर्ण झाले होते तेव्हा मनसेच्या वरीश्ठ पदाधिकार्यांनी मध्यस्था करुन स्थानिक पदाधिकार्यांची कान उघडणी करुन सहकार्य करण्याचे आदेश दिले गावकरी शांत झाले त्यानंतर खालापुर पोलिसांनी जागेचा ताबा घेवून पंचनाम्याला सुरूवात केली मध्यरात्री खालापुर चे तहसिलदार दिपक आकडे यांनी घटनास्थळी पोहोचुन या प्रकाराबद्दल माहिति घेतलीकोट्यावधींचा साठा पाहुन तहसीलदारांना आश्चर्य वाटले त्यांनी धडाकेबाज मनसैनिकांची कौतुकाने पाठ थोपटली पोलिसांनी दोन तांदुळ,गव्हाच्या पोत्यांनी भरलेले दोन ट्रक  ताब्यात घेतले आहेत प्रकरणाच्या  सखोल चौकशीचे आदेश तहसिलदार दिपक आकडे यांनी दिले आहे रोटी सिनेमातील कथानकातील एका दृश्याची आणि लाला शेट ची आठवन करुन देणारा हा प्रकार आहे

विश्वसनीय सुत्रांकडुन मिळालेल्या माहितिनुसार लखनशेट ने स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत तहसिलदारांना मॅनेज करण्यासाठी मध्यस्थाकरवी बोलनी करुन प्रकरण मिटवण्यासाठी धडपडत आहे त्यासाठी तो तहसील कार्यालयाच्या वार्या करत असल्याचेही कळते दुसरीकडे मनसेच्या पदाधिकार्यांनी गरीबांच्या तोंडची रोटी पळवणार्या शेठच्या चौकशी करुन मुस्क्या आवळण्यासाठी जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांना लेखी निवेदन सादर केले आहे

प्रकरण मिटवण्यासाठी माझ्यावर दबाव निर्माण केला जात आहे ,बर्याच लोकांचे मला फोन् आले पण जनसामान्यांशी निगडीत हा प्रश्न आहे यात माझ्याकडुन तडजोड होणे अजीबात शक्य नाही कोणत्याही दबावाला मी न जुमानता पारदर्शक व प्रामाणिक चौकशी करेन 
तहसिलदार दिपक आकडे

Post Bottom Ad