मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगर पालिकेच्या सन 2015-16 च्या अर्थसंकल्पात डॉ. आंबेडकर श्रम साफल्य आवास आश्रय योजनेचा समावेश करा अशी मागणी म्युनिसीपल मजदुर संघाने पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकड़े केली आहे.
पालिकेच्या 28 हजार सफाई काम्गाराना मालकी हक्काचे घर मिलावे म्हणून मुनिसिपल मजदुर संघाने 16 जुलै 2012 रोजी आंदोलन केले होते. त्या नंतर पालिकेच्या अर्थसंकल्पात घ्रांसाठी निधीची तरतूद करण्यास सुरुवात केली. डॉ. आंबेडकर श्रम साफल्य आवास आश्रय योजनेद्वारे अनेक कामगारांना फायदा मिळत होता. परंतू तरीही मुंबई महानगर पालिकेच्या सन 2015-16 च्या अर्थसंकल्पात या योजनेचा समावेश केलेला नाही. ही बाब लक्षात येताच म्यिनिसिपल मजदुर संघाचे सरचिटणीस प्रकाश जाधव यानी महापौराना पत्र देवून या योजनेचा अर्थसंकल्पात समावेश करावा तसेच आर्थिक तरतूद करावी अशी मागणी केली आहे.