मुंबई (प्रतिनिधी)- मुंबईकरांच्या करातून स्थायी समिती कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप कॉंग्रेसच्या नगरसेविका शितल म्हात्रे यांनी केला आहे. यापूर्वी विकास निधी वाटपात भेदभाव केल्यामुळे कॉंग्रेसने सभाग्रहात शिमगा केला होता. आता या प्रकारामुळे पुन्हा शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्यात शाब्दीक युध्द होण्याची चिन्हे आहेत.
यंदाच्या अर्थसंकल्पात के पूर्व विभागातील अंधेरीचा राजा चौकात कमानी बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावात कमानीसाठी ५० लाखाची आर्थिक तरतूद केली असल्याने शिवसेना निधीत गोलमाल करीत असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे. तसेच मागील वर्षी फणसे यांनी त्यांच्या प्रभागात कमानी उभारण्यासाठी ५५ लाखाची तरतूद केली होती. त्यात काही प्रमाणात निधी फेल गेला आहे. याबाबत आपण सत्ताधाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी कायदेशिर लढाई लढाणार असल्याचे त्यांनी सांगितले.