मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून एमएमआरडीए बस रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टम म्हणजेच बीआरटीएस प्रकल्प राबवण्याच्या विचार करत आहे. एमएमआरडीए कडून प्रा थमिक स्वरूपात २८ मार्गांवर बीआरटीएस राबवण्यात येणार असल्याचे समजते. एकाच वेळी एवढय़ा मार्गावर बीआरटीएस सुरू केल्यास वाहतुकीचा विचका होऊ शकत असल्याने ८ मार्गांना प्राधान्य देण्यात आले आहे. वाहतूक आणि इतर बाबींचा विचार केल्यानंतरच मुंबईत बीआरटीएस प्रकल्प वेग घेऊ शकणार आहे.
एमएमआरडीएने बीआरटीएस राबवण्यासाठी पाच मुद्दे ग्राह्य धरले आहेत.यामध्ये पीक अवर्स काळातील बेस्ट प्रवाशांची संख्या, प्रस्ताविक विकास आराखड्यातील तरतुदी, वाहतुकीचे प्रमाण, भविष्यातील प्रकल्प आणि दर तासामागे बीआरटीएसचा वापर करणार्या प्रवाशांची संख्या, या पाच मुद्दय़ांचा समावेश आहे. बीआरटीएसमध्ये १५ उत्तर/दक्षिण आणि १३ पूर्व/पश्चिम रूट निश्चित करण्यात आले आहेत.पहिल्या टप्प्यातील बीआरटीएसला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता, आगामी २ टप्पे राबवण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील त्रुटी आणि होणारे नुकसान पाहून पुढील टप्प्यात सुधारणा करण्यात येणार आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग, एलबीएस मार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड, व्ही. एन. पुरव मार्ग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग या आठ मार्गांवर बीआरटीएस राबवण्याची एमएआरडीएची योजना आहे.
Home
Unlabelled
मुंबईत बीआरटीएस प्रकल्प राबवण्याचा विचार - एमएमआरडीए
मुंबईत बीआरटीएस प्रकल्प राबवण्याचा विचार - एमएमआरडीए
Share This
Share This
About Anonymous
Author Details
JPN News is a trusted Marathi digital news portal operating since 2012-13. JPN News is registered as a news agency with the Government of India. This portal mainly focuses on important social, political, economic, cultural developments in Mumbai, suburbs and Maharashtra. Its main objective is to deliver fast, honest and local to state-level news to the people. Reliability, speed and local vibe are the hallmarks of JPN News.
