मुंबई - आरेतील प्रस्तावित मेट्रो कारबाबत निर्णय घेण्यासाठी एक विशेष समिती गठीत करण्यात येईल अशी माहिती मुख्यमत्री देवंद्र फडणविस यांनी आज मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या शिष्टमंडळाला दिली.
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. याशिष्टमंडळामध्ये गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, राज्य मंत्री विद्या ठाकूर, आमदार आणि वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य अमित साटम, मनिषा चौधरी, आमदार योगेश सागर, अतुल भातकळकर, सुधार समितीच्या अध्यक्षा उज्वला मोडक, जयप्रकाश ठाकूर, अभ्ीजित साटम, संदीप उपाध्याय तसेच वृक्षप्राधिकरणाचे सदस्य निरंजन शेट्टी, योगेश वर्मा, कमलाकर दळवी, सुनिल राणे शरद शहा पेटीवाला विनायक कामत आणि अमरजित मीश्रा आदी पदाधिकाऱयांचा यामध्ये समावेश होता.
मेट्रो कारशेड तर झाली पाहिजे मात्र त्यामुळे होणारी पर्यावरणाची हाणी होऊ नये. झाडे वाचायला हवीत अशी भूमिका भाजपाने घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत निर्णय घेण्यासाठी एक विशेष समिती गठीत करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी केली. या समतीमध्ये एमएमआरडीएचे आयुक्त, महापालिका आयुक्त आणि नगरविकास प्रधान सचिव 1 यांच्यासह पर्यावरणाचे अभ्यासक म्हणून या समितीमध्ये निरीचे डायरेक्टर डॉ. राकेश कुमार, सेंटर ऑफ सायन्सच्या डॉ. रश्मी पाटील, आणि आयआयटीचे तज्ज्ञ डॉ. रवी सिन्हा तर मेट्रोचे तज्ञ म्हणून कलकत्ता मेट्रोचे जनरल मॅनेजर आणि दिल्ली मेट्राचे डायरेक्टर जी. आर मदान आदींचा या समितीमध्ये समावेश आहे. ही समिती एक महिन्यात आपला अहवाल देणार आहे
ही समिती कारशेड साठी पर्यायी जागा उपलब्ध आहेत का याचा अभ्यास करणार आहे. जर पर्यायी जागा उपलब्ध नसेल तर सध्याच्या जागेवरील झाडांचे त्याच मातीत आणि त्याच वातावरणात पुर्नवसन करण्यासाठी जागातील अद्ययात तंत्रज्ञानही ही समिती सूचविणार आहे. तसेच जनतेचे महणणेही ही समिती ऐकून घेणार असून या समतीचा अहवाल येईपर्यंत सध्या प्रस्तावित कारशेडच्या जागेवरील एकही झाड तोडण्यात येणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे भाजपाने स्वागत केले आहे. मुख्यमंत्र्यांकडे तब्ब्ल वीस मिनिटे झालेल्या या बैठकीला मिलिंद म्हैसकर, अश्विनी भिडे आणि अन्य अधिकारीही उपस्थित होते.
