प्रल्हाद मोदींचे भाजप विरोधात रामलीला मैदानात आंदोलन
मुंबई / प्रतिनिधी - अन्न सुरक्षा कायद्यामध्ये बदल करुन देशातील जनतेला रेशनिंग कार्डवर पुन्हा वाढीव धान्य मिळावे यासाठी पंतरप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी भाजप सरकार विरोधात १७ मार्च रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानात मोठे आंदोलन काढणार आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी देशभरातील नागरीकांनी आणि शिधावाटप परवाना धारकांनी मोठया प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहान प्रल्हाद मोदी यांनी केले आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. प्रल्हाद मोदी यांच्या आंदोलनांच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या भावाच्याच आंदोलनाचा सामना करावा लागणार आहे.
मुंबईतील आजाद मैदानात सोमवारी प्रल्हाद मोदी आणि पुष्कराज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसीन परवानाधारक महासंघाच्यावतीने आंदोलन काढण्यात आले होते. यावेळी राज्यभरातील शेकडो शिधावाटप परवानाधारक दुकानदार सहभागी जाले होते. आंदोलनानंतर प्रल्हाद मोदी आणि पुष्कराज काका देशमुख यांनी पुढील आंदोलनांची माहिती देण्यासाठी पत्रकार परीषदेचे आयोजन केले होते.
आॅल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर्स फेडरशनची २६ जानेवारी २॰१५ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये काही मुद्दे मांडण्यात आले. कुटुंबबाजी संख्या लक्षात घेऊन रेशनिंग कार्डवर वाढीव धान्य देण्याची तरतुद करण्यात यावी आणि अन्न सुरक्षा कायद्याच्या दुरुस्तीसाठी आमच्या समितीशी केंद्र सरकारनी आमच्याशी चर्चा करावी असा असे विविध मुद्दयांवर आमची चर्चा जाली असल्याचे प्रल्हाद मोदी यांनी यावेळी जाहिर केले. याच मागण्यासाठी येत्या १७ मार्च रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानात भव्य आंदोलन छेडणार असल्याचे प्रल्हाद मोदी यांनी जाहिर केले.
अन्न सुरक्षा कायद्याच्या चुकीच्या अमंलबजावणीमुळे शिधावाटप परवाना धारकांना नुकसान जाले आहे. शिधावाटप परवानाधारकांना विश्वाससात न घेतल्यामुळे दिल्लीमध्ये भाजप सरकारला मोठे नुकसान जाले होते. जर आता आमच्याकडे पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुलर्क्ष केले तर बिहार-उत्तरप्रदेशमध्ये होणाऽया निवडणुकीत भाजपची परिस्थिती दिल्लीसारखी होणार असल्याचा इशारा प्रल्हाद मोदी यांनी दिले आहे. आम्ही सर्वात आधी दुकानदार आणि त्यांच्या सुविधाबाबत विचार करतो त्यांनतर भाजप पक्षाचा असा वक्त्व प्रल्हाद मोदी यांनी यावेळी केले.