मुंबई : अवयवदानाचे महत्त्व मुंबईकरांना समजण्यासाठी मुंबई महापालिका 'एमसीजीएम ऑर्गन ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन' (मोटो) या संस्थेच्या मदतीने येत्या वर्षभरात अवयवदानासंबंधी माहिती देणारे १00 जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे, अशी माहिती पालिकेच्या वैद्यकीय शिक्षण आणि मोठय़ा रुग्णालयांच्या संचालिका डॉ. सुहासिनी नागदा यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाने २७ मार्च हा अवयव दिन म्हणून जाहीर केला आहे. यानिमित्त अवयवदानाबद्दल मुंबईकरांना माहिती होण्यासाठी शुक्रवारी पालिकेच्या मुख्यालयात दुपारी दोन वाजता जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त या वेळी उपस्थित राहणार आहेत. अवयवदानाचे महत्त्व आणि रुग्णांची तातडीची गरज लक्षात घेऊन केईएम रुग्णालयात किडनी आणि लीव्हर प्रत्यारोपण सुविधा देणारी 'ओपीडी' सुरू केली आहे. शहरातील काही निवडक रुग्णालयांत हे प्रत्यारोपण करण्यात येत असून केईएमच्या ओपीडीचा सातवा क्रमांक आहे, असे डॉ. नागदा म्हणाल्या.