आझाद मैदानात अंगणवाडी सेविकेचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 March 2015

आझाद मैदानात अंगणवाडी सेविकेचा मृत्यू

मुंबईत तापमानाचा पारा ४० अंशांवर गेला आहे. मुंबईत वाढलेल्या या उन्हाच्या तडाख्याने बुधवारी आझाद मैदानात आशा पवार या अंगणवाडी सेविकेचा मृत्यू झाला. राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन केले होते. यात सहभागी झालेल्या पवार यांना रणरणत्या उन्हामुळे अचानक चक्कर आली. त्यांना उपचारासाठी तात्काळ जी. टी. रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. पवार या राहुरीच्या असून त्यांच्या पश्चात २ मुलगे, १ मुलगी आणि पती असा परिवार आहे.

Post Bottom Ad