महापालिका शाळेचा विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापालिका शाळेचा विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार

Share This
मुंबई : न्यूयॉर्क केनकेन आंतरराष्ट्रीय गणित स्पर्धेत मुंबई महापालिका शाळेतील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी मोहम्मद अली बाशी सय्यद याची निवड झाली आहे. भारतातील २४ शहरांमध्ये झालेल्या स्पर्धेत सुमारे ३५ हजार विद्यार्थ्यांमधून त्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

ग्रेसीम लिमिटेड संस्थेमार्फत केन केन आंतरराष्ट्रीय गणित स्पर्धा आयोजित करण्यात येते. तार्किक पद्धतीवर आधारित ही स्पर्धा असते. महापालिकेच्या एन, एस, टी विभागातील सुमारे २ हजार विद्यार्थी या स्पर्धेत प्रवेशाकरीता सहभागी झाले होते. ४ टप्प्यात या परीक्षा घेण्यात आल्या. ९ मार्च, २0१५ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेत 'एन' विभागातील पंतनगर महापालिका इंग्रजी शाळेतील पाचवी इयत्तेतील विद्यार्थी मोहम्मद अली बाशी सय्यद हा संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. केन केन आंतरराष्ट्रीय गणित स्पर्धेकरीता न्यूयॉर्क येथे ३१ मे, २0१५ रोजी प्रतिनिधित्व करण्याची संधी त्याला प्राप्त झाली आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages