महानंदाला ७६ दुधसंघांकडून दुध पुरवठा अनियमित - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महानंदाला ७६ दुधसंघांकडून दुध पुरवठा अनियमित

Share This
मुंबई दि. १३ – महाराष्ट्र राज्य सहकारी दुधसंघ (महानंद) चे सदस्य असलेल्या राज्यातील १०५ पैकी ७६ दुधसंघांचा दुध पुरवठा नियमित नसल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी महानंदाने नोटीसा बजावल्या  असल्याची माहिती दुग्ध विकास मंत्री एकनाथ खडे यांनी दिली.

भाजपा आमदार अॅड. आशिष शेलार यांनी याबाबत विधानसभेत तारांकित प्रश्न विचारला होता त्याला दिलेल्या लेखी उत्तरामध्ये दुग्धविकास मंत्र्यांनी सांगितले की, १०५ पैकी ७६ दुग्ध संस्थांनी महानंदाला नियमितपणे दुध पुरवठा केला नसल्याचे जानेवारी २०१५ मध्ये  निदर्शनास आले आहे. यासर्वांना 19 जानेवारी ला खुलासा सादर करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. त्यापैकी 15 जणांनी खुलासे केले असून उर्वरित जणांचे खुलासा आले नसल्याची माहिती मंत्र्यांनी दिली.   

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages