कंत्राटदार संस्थेवर कारवाईची मागणी
मुंबई / प्रतिनिधी : मानखुर्द येथील महाराष्ट्रनगर मधील कृष्णा कोयना चाळीतील शौचालयाच्या भांड्यासह टाकीत पडून महिलेचा बुधवारी मृत्यू झाला. कल्पना बाबुराव पिंपळे (25) असे या महिलेचे नाव आहे. सदर शौचालयाची 4 वर्षापुर्वी पंचमुखी या संस्थेने दुरुस्ती केली होती. याप्रकरणी जबाबदार संस्था तसेच पालिका अभियंत्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्याव्दारे केली. या मागणीला विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेकर यांनी समर्थन दिले.
यावेळी मुद्दा उपस्थित करताना देशपांडे म्हणाले की,मानखूर्द येथील शौचालयाचे भांड्यासह महिलासहा वाजता शौचालयाच्या टाकीत पडली. अग्नीशमन दलाच्या अथक प्रयत्न करुन तिला 4 तासांनंतर टाकी बाहेर काढले परंतु तो पर्यंत गुदमरुन तिचा मृत्यू झाला होता.या कंत्राटदार संस्थेने 4 वर्षा पुर्वी या शौचालयाची दुरुस्ती केली होती. या महिलेच्या मृत्यूला सदर संस्था तसेच बांधकामाला परवानगी देनारे पालिकेचे अभियंते जबाबदार असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी असे देशपांडे म्हणाले.
