मुंबई,दि.10(प्रतिनिधी):गोरेगाव येथे मेट्रो 3 प्रकल्प राबवू नये कारण मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व आरे कॉलनी हे दोनच मोठे हरितपट्टे आहेत. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने त्यामध्ये अन्य कोणतेही काम करु नये अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केल्याची माहिती उत्तरप्रदेशचे राम नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी तारापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांच्या,मच्छिमार प्रकल्पग्रस्तांच्या, व कुष्ठरोगपिडीत रुग्णांबाबत चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. राम नाईक यांनी विविध प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळांसह मुख्यमंत्री फडणवीस यांची रविवारी सह्याद्री अतिथी गृह येथे भेट घेतली होती.
या भेटीबाबत माहिती देताना नाईक म्हणाले की गोरेगाव येथील आरे कॉलनीत मेट्रो 3 च्या कामासाठी झाडे तोडू नयेत त्यासाठी प्रस्तावात बदल करावा असे मुख्यमंत्र्यांना सुचविण्यात आले आहे. तसेच या भेटीत तारापुर अणुउर्जा प्रकल्पपिडीतांच्या पुर्नवसनाबाबत न्यायालयात सुनावणी सुरु आहे. 16 मार्च रोजी होणार्या सुनावणीत सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, कुष्ठपीडितांच्या सशक्तीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यातील कुष्ठपिडीतांना निर्वाह भत्ता म्हणून 2500 रुपये द्यावे,1953 पासून बोरीवलीतील संजय गांधी उद्यानात अस्तित्वात असलेल्या अधिकृत स्टॉलधारकांचे स्टॉल वन जमीन कायदा अस्तित्वात आल्यानंतर स्टॉल तोडण्यात आले होते. आता तिथे अन्य मार्गाने स्टॉल खानपान सेवा सुरु करण्यात येण्याची शक्यता आहे. जुन्या स्टॉलधारकांनाच तिथे जागा द्यायची की नाही याबाबत सरकारने निर्णय घ्यावा असा आदेश न्यायालयाने दिला आहे. सरकारने जुन्या स्टॉल धारकांनाच पुन्हा जागा द्यावी अशा मागण्या केल्याचे नाईक
यांनी सांगितले.
अखिलेश यादव यांच्याशी नाराजी नाहीउत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. उत्तरप्रदेशच्या विकासासाठी काम करणे हे दोघांचेही उद्दीष्ट आहे. आम्हा दोघांमध्ये उत्तम संबंध आहेत मात्र आमचे काम ज्यांना नको आहे ते नाराजीची अफवा पसरवत असल्याच्या बातम्या पसरवत आहे असे राम नाईक म्हणाले.