नवीन मालमत्ता करवसूली धोरणात बदल
मुंबई (प्रतिनिधी)- पालिकेने तयार केलेल्या भांडवली मुल्याधारित नवीन करप्रणाली धोरणात बदल करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईकरांना बिल्डअपऐवजी कार्पोरेट एरियानुसार मालमत्ता कर लावले जाणार आहेत. यापूर्वी मालमत्ता कराबाबत कोर्टाने फटकारल्यानंतर आणि सर्वपक्षिय गटनेत्यांनी दबाव आणल्यानंतर हे बदल केले आहेत.
पालिकेच्या नवीन भांडवली मुल्याधारित मालमत्ता करप्रणालीला न्यायालयात आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने फटकारे असता पालिकेने सुधारीत नवीन मालमत्ता करात बदल केला. यावेळी १.२० हे सूत्र टाकण्यात आले होते. या सुत्राला पालिकेतील भाजपा व मनसेच्या गटनेत्यांनी विरोध केला. पालिकेचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून हा सुत्र वापरण्यात आल्याचे स्पष्टीकरण पालिकेने दिले. परंतु, न्यालायालचा निर्णय आणि गटनेत्यांचा विरोध यामुळे पालिकेने हे सुत्र सन २०१५-१६ या वर्षाकरीता वगळले आहे. परिणामी, पालिकेचे १३ कोटींचे आर्थिक नुकसान होणार आहे. याबाबतची माहिती पालिका प्रशानसाने आज झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत दिली.