मुंबई : राज्यातील महिला सुरक्षित असल्याचा दावा विविध सरकारी यंत्रणा करत असल्या तरी वास्तवात धक्कादायक चित्र आहे. महिला आणि अल्पवयीन मुलींविरोधातील गुन्हेगारीचा टक्का वाढताच असून महिलांविरोधातील गुन्हेगारीत महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागत असल्याचे उघडकीस आले आहे. अशा गुन्ह्यांत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांपाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. यासंदर्भातील आकडेवारी नुकतीच लोकसभेत सादर करण्यात आली. या आकडेवारीने महाराष्ट्रातील महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.
देशभरात २0१४ मध्ये नोंद झालेल्या महिला आणि अल्पवयीन मुलींविरोधातील २ लाख ४५ हजार गुन्ह्यांपैकी सर्वाधिक ३१,२५१ गुन्ह्यांची उत्तर प्रदेशमध्ये नोंद झाली. त्यापाठोपाठ मध्य प्रदेशमध्ये २७,५७४, महाराष्ट्रात २५,८५९ आणि आंध्र प्रदेशमध्ये २0,७५६ गुन्हे दाखल झाले. महिलांविरोधातील या गुन्हेगारीत बलात्कार, अपहरण, हुंडा बळी, महिलांवर हल्ला, विनयभंग, पतीकडून छळवणूक, गैरकामासाठी मुलींना परदेशात पाठवणे, हत्या, अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात लोटणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. संपूर्ण देशभरात गाजलेल्या दिल्लीच्या निर्भया प्रकरणानंतर कठोर कायदे करण्यात आले तसेच खटले तातडीने निकाली काढण्यासाठी जलदगती न्यायालयेही स्थापण्यात आली. मात्र, महिलांविरोधातील गुन्हेगारीचा आलेख उंचावताच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. महिलांविरोधातील गुन्ह्यांची वेळीच उकल करण्यासाठी पोलीस यंत्रणेने कठोर पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी महिला वर्गातून केली जात आहे.