मुंबईच्या लाचखोर महापौरांनी राजीनामा द्यावा - विरोधी पक्षाची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईच्या लाचखोर महापौरांनी राजीनामा द्यावा - विरोधी पक्षाची मागणी

Share This
मुंबई ३० मार्च (अजेयकुमार जाधव ) - मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांना विकास कामासाठी निधी देताना महापौरांनी कंत्राटदारांकडून टक्केवारी घेवून निधी वाटप केल्याचा आरोप मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. या प्रकारा विरोधात मनसेच्या दोन नगरसेवकांनी लाच लूचपत खात्याकडे तक्रार दाखल केली असून यामध्ये निधी वाटपाची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता संदीप देशपांडे आणि महापौर स्नेहल आम्बेकर यांच्यामध्ये झालेला संवाद उघड झाला आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर पालिकेतील विरोधी पक्ष नेते देवेन्द्र आंबेरकर यांनी लाचखोर महापौरांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. 

संदीप देशपांडे यांनी या निधी वाटपात कंत्राटदारांशी महापौरांनी संगनमत केले असल्याचा आरोप केला होता. पालिकेच्या मुंबईतील २४ वार्ड पैकी सर्वात जास्त निधी एल वार्ड, कुर्ला भागातील नगरसेवकांना वाटण्यात आला असून तेथील कंत्राटदारांच्या पत्रावर महापौरांनी निधी वाटप केल्याचा आरोप देशपांडे यांनी केला होता. देशपांडे यांनी ज्या कंत्राटदारांच्या मार्फत नगरसेवकांनी निधीसाठी पत्र दिले आहे. त्यांना निधी देण्याचे स्वतः महापौरांनी आपल्याला सांगितल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर देशपांडे आणि महापौर यांच्यामध्ये झालेला फोन वरील संवाद उघड झाला आहे. या संवादात महापौरस्नेहल आंबेकर या मनसेच्या नगरसेविका वैष्णवी सरफरे यांना कंत्राटदारा मार्फ़त निधी मंजूर झाल्याचे बोलत आहेत असे ध्वनीफीतीत आहे. सदर ध्वनीफीत जाहीर होताच संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईच्या महापौरांच्या निधी वाटपाची चर्चा आहे. 

संदीप देशपांडे आणि महापौर यांच्या मधील ही ध्वनीफीत जाहिर होताच महापौरानी आपल्या पदाचा आणि निधी वाटपाचा बाजार मांडला आहे, महापौरानी अनेक वेळा वादग्रस्त विधाने केली आहेत, महापौरानी मुंबई शहराची शान धुळीस मिळवल्याचे काम केले आहे असे सांगत शहराला लागलेला कालिमा फुसून काढण्यासाठी महापौराचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेन्द्र आंबेरकर यानी केली आहे.

महापौर स्नेहल आंबेकर आणि मनसे नगरसेवक व गटनेते संदीप देशपांडे यांच्यामध्ये झालेले संभाषण 
हॅलो…हां महापौर बोलणार आहेत (फोन ट्रान्सफर)
महापौर : हॅलो जय महाराष्ट्र –
संदीप देशपांडे – हां जय महाराष्ट्र मॅडम बोला,
महापौर – बरं तेच आता मी फायनल करतेय, म्हणून म्हटलं एकदा परत एकदा विचारावं..काय करायचं..आपणहून विचार केलाय सगळ्यांना खूश करायचं…कारण किती सगळा विचार केला तरी ते बाकीकडून येणार ते येणारच..हे करून..हो ना? आता तुमच्याकडून इंडिव्हिज्युअलही येऊन गेले आहेत..कारण मी आता तुला 2 बोलले होते ना, पक्षासाठी..म आता फायनल बोलते, 3 देते पक्षाला..
संदीप देशपांडे – नको मॅडम, नको..तुम्ही तुमच्या पद्धतीने करून घ्या..
महापौर – नाही..बाकीचे सगळे पक्ष तुझ्या भरवशावर राहिलेत ना..इतर. त्यांचे सगळ्यांचे लेटर आलेत
संदीप देशपांडे- त्यांचे सगळ्यांचे लेटर तुम्हाला देतो, तुम्हाला वाटल तसं करा मॅडम.
महापौर – नाय नाय, पण ऐक ना मी काय म्हणते, इतर लोकांचीही लेटर्स आलेली आहेत. पण ते केवळ तुझ्या शब्दाखातर बोलले नसतील, माझ्याशी..
संदीप – आता तुम्ही मामांचं (दिलीप लांडे, मनसे नगरसेवक, कुर्ला ) ऑलरेडी केलाय ना?
महापौर – मामांचं नंतर..ही पण आहे..वैष्णवी सरफरे (मनसे नगरसेविका, भांडूप) आहे. हीच पण मला वाटतं आलेलं आहे. कॉन्ट्रॅक्ट थ्रू आलेलं आहे वाटतं.तीच तीचं कामककडे आहे. तीच लेटरपण आहे म्हणजे आणि मामांचं आहे. म कसं काय काय करू म?
संदीप देशपांडे – अजून कुणाचे आलेत लेटर डायरेक्ट?
महापौर – लेटर….आता त्यांच्यावर कारवाई करायचं टेन्शन येतं बाबा (हासण्याचा आवाज)
संदीप देशपांडे – आता मी कशाला कारवाई करू , (महापौरांचा हसण्याचा आवाज) लेटर तर सगळ्यांनाच दिलेत ना मॅडम
महापौर – हो लेटर सगळेच.. तसंच झालंय.. तर म काय करू असं?
संदीप देशपांडे – मी तुम्हाला करू मॅडम दोन मिनिटात फोन?
महापौर – हो चालेल..चालेल
दुस-या फोन कॉलचे संभाषण
हॅलो संदीप देशपांडे बोलतोय, मॅडम आहेत का?
दुसरीकडून पुरुषाचा आवाज..हो एक मिनिट हं  (फोन ट्रान्सफर होण्याचा आवाज)
महापौर – हॅलो बोला
संदीप देशपांडे – मॅडम, तुम्ही मामांना तीन आणि हिला 6 दिलेत ना, वैष्णवीला?
महापौर – अं..नाही.. 6 नाही दिलेलं.. एक मिनिट हं जरा (महापौरांची दुसरीकडे विचारपूस – सरपरेला किती दिले, मामांना किती आणि सरफरेला किती दिले असं विचारत आहेत. काय गरज नाही ना सांगायची?) थोडा वेळ थांबून—हॅलो.. सरफरेला दोन आहेत.
संदीप देशपांडे – दोन आहेत काय? आआआआ…म माझं म्हणणं होतं की, तुम्ही..मला काय वाटलं, पेपरमध्ये मी सहा वाचलेलं. त्यामुळे मला वाटलं की सहा दिलं.
महापौर – पेपरमध्ये ते चुकीचं आहे..नोटिफिकेशन नाही, काय नाही..नाना नवरे – पाच, सईदा खानला सहा..हाहाहा.. काय वेड लागलंय का? (हसण्याचा आवाज). ते सगळं चुकीचं आहे. त्याबद्दल मी लिहिते पण आहे लेटर..की नोटिफिकेशनच्या आधी तुम्ही कसं काय लिस्ट डिक्लेर करता चुकिची माहिती. खोटी. तर ते मी लेटर लिहिलय आता संपादकांना..खुलासा करण्यात यावा. कशी माहिती घेतली ती.
संदीप देशपांडे – मॅडम म तुम्ही वैष्णवीला दोन, मामांना तीन – 5 दिलेत काय?
महापौर – हां
संदीप देशपांडे –म आम्हाला पाच द्या, एकूण दहा करा. आणि सगळ्यांना इक्वल डिस्ट्र्युबुट करून टाका
महापौर – नाय नाय पाच होत नाय ना.
संदीप – आं.. मॅडम तुम्ही आता समाजवादीला किती दिलेत? समाजवादीचे 9 नगरसेवक, आणि माझे 28 नगरसेवक  आहेत मॅडम.
महापौर – नाय नाय तरी पण त्या दिवशी मी बोलत होती ना…आता त्यानंतर एवढ्या घडामोडी झाल्या. प्रोजेक्टसाठी पण त्यांनी मागितले ना माझ्याक़डे.. ज्येष्ठ नागरिकांसाठी मागितलंय. नंतर..ते देशमुखसाहेबपण कायतर म्हणतायेत. मॉडियर लॅबसाठी..असं झालेलं आहे. म्हणून म्हणते चार तर करतेच ना..बघा ना..पुढे मागे आहोत आपण करूया..
संदीप देशपांडे – पाच करा मॅडम, आता जाऊंदे..पाच करा
महापौर- अहो काय,, कुठे उरेल कुठे, माझ्याकडे काय
संदीप देशपांडे – उरेल हो मॅडम, उरेल..पाच करा.
महापौर – कुठे उरेल..आता एवढं आपल्याला रिलेशन चांगलं ठेवायचंय, म्हणून मी स्वत: पुढाकार घेऊन करतेय.
संदीप देशपांडे – हो ना मॅडम, मी कुठे नाही म्हटलं. पाच करा पण सगळ्यांना इक्वल डिस्ट्र्युबुट करा. म्हणजे ते मामाला जास्ती, वैष्णवीला दोन असं करू नका.
महापौर – नाय नाय, ते वेगळा इश्यु आहे ना.
संदीप – नाय म तसं नका करू मॅडम, माझ्या अंगावर येईल सगळं. म मला देऊच नका तुम्ही, जे केलंय ते करून ठेवा.
महापौर – नाय नाय, ते त्यांना द्यायचं नाही ना तुम्ही. त्याच्यामध्ये ते दोघेच येतील.
संदीप – नाय ते मॅडम.. म ते हे होतं की.. म त्यांना असं वाटेल की…म ते आमच्या  पक्षात प्रॉब्लेम होईल.
महापौर – नाय..बाकीच्या सगळ्यांनी तसंच केलेलं आहे. सगळ्यांकडून तसंच आलेलं आहे.
संदीप – सगळ्यांची गोष्ट वेगळी पडते ना मॅडम आणि आमची वेगळी पडते. नको म तुम्ही एक काम करा, तुम्ही जे टाकलाय ते टाकून द्या. मला नको वेगळा.
महापौर – म बाकीच्यांचं नुकसान होईल ना.
संदीप – होऊ दे ना..मी ते करीन..सायबांना सांगेन मी काय सांगायचं ते.
महापौर – बर ठीक आहे. ओके…
फोन कट

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages