मुंबई : अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना लवकरच वाढीव मानधन देण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी पुरेशा निधीची तरतूद अर्थसंकल्पात केल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. शेकापचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी अंगणवाडी सेविकांचा प्रश्न औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुनगंटीवार बोलत होते.
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना अतिशय तुटपुंजे मानधन मिळते. त्यांच्या मानधनात वर्षभरापूर्वी अनुक्रमे ९५0 रु. व ५00 रु. इतकी वाढ करण्यात आली होती. मात्र ही वाढ कागदावरच राहिली. प्रत्यक्षात त्यांना वर्षभरात वाढीव मानधनाचा लाभ मिळालाच नसल्याची बाब गणपतराव देशमुख यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे उपस्थित केली. एका लाखापेक्षा अधिक संख्या असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना वाढीव मानधनासह पैसे देण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली. मागच्या सरकारने केवळ निवडणुका डोळय़ासमोर ठेवून हा निर्णय घेतला होता. त्यासाठी कोणतीही आर्थिक तरतूद न केल्याने वर्षभर या निर्णयाचा लाभ मिळू शकला नव्हता. मात्र या वर्षीच्या अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्यात आली असून लवकरच अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना वाढीव मानधनासह संपूर्ण मानधन देण्यात येणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.